Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त दहा रुपयांसाठी नातवाने केला आजीचा खून; लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली अन् नंतर…

तसेच खर्चासाठी दहा रूपयांची मागणी केली. तेव्हा तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या नातवाने तिच्यावर लाकडी काठीने हल्ला चढविला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2025 | 01:34 PM
बेदम मारहाण करून दारूड्या भावाची हत्या

बेदम मारहाण करून दारूड्या भावाची हत्या

Follow Us
Follow Us:

महागाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आठवडाभरापूर्वी माळकिन्ही येथे मनोरुग्ण लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला होता. त्यानंतर आता मनोरुग्ण नातवाने फक्त 10 रुपयांसाठी आजीचा निर्घृण खून केला. ही घटना तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी) येथे बुधवारी सकाळी घडली.

कोंडाबाई बालचंद्र जाधव (वय ८५, रा. सुधाकरनगर, तांडा) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. तर श्याम उत्तम जाधव (वय २६, रा. सुधाकरनगर तांडा) असे तिच्या मारेकरी नातवाचे नाव आहे. वार्धक्याने कोंडाबाई ही नेहमीच आजारी राहायची. गेल्या काही दिवसांपासून तर ती अंथरूणाला खिळली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ती आराम करत असताना आरोपी नातू तिच्याकडे आला.

तसेच खर्चासाठी दहा रूपयांची मागणी केली. तेव्हा तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या नातवाने तिच्यावर लाकडी काठीने हल्ला चढविला. त्यामध्ये तिच्या तोंडाला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

दरम्यान, ही बाब शेजारी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला सवना येथील ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी यावेळी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. शिवाय घटनास्थळ गाठून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले.

नातेवाईकांच्या जीविताला धोका

महागाव तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्णांची संख्या वाढतीच आहे. क्षुल्लक कारणावरून त्यांच्याकडून हिस्त्र होत गुन्हेगारी घटना घडत आहे. नागरिकांच्या नव्हेतर नातेवाईकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने मनोरुग्णांचे गावपातळीवर सर्वेक्षण करून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Grandson murdered grandmother for just ten rupees incident in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.