Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर विनाकारण आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करत परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 04:03 PM
आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • आकुर्डीत जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला
  • आठ ते नऊ जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण
  • निगडी पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर विनाकारण आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करत परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता आयमॅक्स ऑप्टीशियन समोर, आकुर्डी येथे घडली आहे. या प्रकरणात केदार संतोष यादव (वय २१, चिखली गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण साठे आणि त्याचे ८ ते ९ साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण साठे याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र हर्षद पवार हे रस्त्याने जात असताना आरोपी करण साठे याच्यासोबत झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. फिर्यादी व त्यांचा मित्र जीव वाचवून पळत असताना आरोपींनी पाठलाग करून दोघांना पकडले. करण साठेच्या एका साथीदाराने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली, तर दुसऱ्या साथीदाराने सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारून दुखापत केली. तसेच करण साठे याने धारदार शस्त्राने हर्षद याच्या डोक्यात व पाठीवर वार करून खूनाचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

१६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला

मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित अल्पवयीन मुलाने काही महिन्यांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि सुधारगृहातून बाहेर आलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत फोटो काढला होता. त्यानंतर त्याने ‘King Is Back’ असे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. या स्टेटसमुळे पूर्वीच्या हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच रागातून संबंधित मुलावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याची घटना कुठे घडली?

    Ans: आकुर्डी येथे आयमॅक्स ऑप्टीशियनसमोर ही घटना घडली.

  • Que: हल्ला कधी झाला?

    Ans: २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता हल्ला झाला.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक झाली?

    Ans: करण साठे याला निगडी पोलिसांनी अटक केली.

Web Title: A shocking incident has taken place in akurdi where two young men were severely beaten nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु
2

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

Sangli News: साखर कामगारांचा आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप; सांगलीतील वसंतदादा कारखान्यासह ९ साखर कारखाने पडले बंद
3

Sangli News: साखर कामगारांचा आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप; सांगलीतील वसंतदादा कारखान्यासह ९ साखर कारखाने पडले बंद

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.