Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चुंबल्या ऊर्फ रितेश राजनंद कसबे (वय २१, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 03:42 PM
चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा कठोर निर्णय; आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
  • लातूर विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • आरोपीला ५ हजार रुपयांचाही दंड
लातूर : राज्यासह देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. वाढत्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चुंबल्या ऊर्फ रितेश राजनंद कसबे (वय २१, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर) याला लातूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

 

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला आहे. चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवळ नागनाथ येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही घटना घडली आहे. आठ वर्षांची मुलगी इतर मुलांसोबत खेळत असताना आरोपीने मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून तिला जवळ बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने १० फेब्रुवारी २०२५ रोजी चाकूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हे सुद्धा वाचा : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

साक्षीदारांच्या जबाबांनी गुन्हा सिद्ध 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे यांनी केला. तपासादरम्यान संकलित केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाने तोंडी साक्षींसह वैज्ञानिक पुरावेही सादर केले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान आरोपीने बचावासाठी पीडित मुलीच्या आईवर आरोप केले. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व वैज्ञानिक पुरावे यांमुळे आरोपीचा बचाव ग्राह्य धरला गेला नाही. जिल्हा सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश महिंद्रकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. सोमेश्वर बिराजदार, अ‍ॅड. विद्या वीर आणि अ‍ॅड. पल्लवी यादव यांनी सहकार्य केले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलने खटल्याच्या कामकाजात योगदान दिले.

हे सुद्धा वाचा : अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला किती वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: चुंबल्या ऊर्फ रितेश राजनंद कसबे याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

  • Que: आरोपीला कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली?

    Ans: लातूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

  • Que: आरोपीला किती रुपयांचा दंड ठोठावण्यात आला?

    Ans: न्यायालयाने आरोपीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Web Title: The court has handed down a severe sentence to the accused in the case involving the molestation of a little girl nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur news

संबंधित बातम्या

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु
1

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
2

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
3

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
4

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.