GURUGRAM(फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
हरियाणा मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृतदेह शहरातील शिव नादर शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काळ्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला.
गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाच्या डोक्यावर खोल जखमांच्या खुणा आहेत आणि त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटवणाऱ्याला २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात येत आहेत. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.
गुरुग्राम पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मृत महिलेने हिरवा टॉप आणि हिरवा जीन्स घातला होता आणि तिच्या उजव्या हातात बांगडी होती. तिच्या उजव्या मनगटावर टॅटू आणि डाव्या हातावर ब्रेसलेट होता. तिच्या डाव्या अंगठ्यावर ८ क्रमांकाचा टॅटू होता आणि डाव्या खांद्याच्या खाली काळ्या आणि लाल रंगात ‘माँ’ हा शब्द लिहिलेला होता.” मृताचे वय सुमारे ३० ते ३५ वर्षे आहे.
२५ हजारांचे बक्षीस
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, “आम्ही मृताची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि मृताची ओळख पटवणाऱ्या व्यक्तीला २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.”
प्राथमिक चौकशीत काय?
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, फरीदाबाद रोडवरील घटनास्थळाची पोलिसांच्या गुन्हेस्थळी, फिंगरप्रिंट आणि श्वान पथकाच्या पथकांनी पाहणी केली. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मृतदेह दुसऱ्या ठिकाणाहून आणून येथे फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.
पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतला तांत्रिकांचा आधार
मध्यप्रदेश मध्ये असे काही घडले जे ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले. आपल्या बायकोवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन नवरोब्यांनी तंत्रिकांचा आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार जंगलात गेले परंतु ते जंगलातून थेट तुरुंगात गेले. असं काय केलं त्या दोघांनी? जे ते थेट तुरुंगात पोहोचले. नेमकं काय प्रकरण? सविस्तर बातमी….