हिंगोलीत भीषण अपघात; भरधाव डंपरने अनेकांना चिरडले, दोघांचा मृत्यू तर 6 जण गंभीर (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मालवाहू वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल रोडवर घडली असून काल रविवारी संध्याकाळी हा अपघात झाडाला आहे. रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी मृतांची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघात झालेले मालवाहू चार चाकी वाहन काल संध्याकाळी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी उपज पोहोचून परत काटोलच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व तो थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात मालवाहू वाहनात बसलेल्या तिघांचा मृत्यू झालाय. अपघात एवढा भीषण होता की घटनेच्या वेळेला त्या ठिकाणातून जात असलेल्या काही दुचाकी चालकांनाही त्याची झळ बसली आणि दुचाकी चालक ही जखमी झाले.
विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; चंद्रपूरमध्ये दोन मृत
राज्याच्या काही भागात उष्णता कमी होण्याचा नाव घेत नाही आहे तर काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून आपला कहर केला आहे. विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. नागपूर शहरात जोरदार पावसाच्या सरीसह गारा पडल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपुर जिल्ह्यात दोघांचा मृत्य देखील झाला आहे. गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; चंद्रपूरमध्ये दोन मृत, पुढील 4-5 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता