crime (फोटो सौजन्य: social media )
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. सतत हत्या, हाणामारी, ड्रग्स या सारख्या गुन्ह्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहे. आता पिंपरी चिंचवडमधून हत्येची एक घटना समोर आली आहे. एका जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला तरुण हा जिमट्रेनर तरुणीला वारंवार त्रास देत होता. त्यातून ही घटना घडली असल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समीर आलेलं आहे.
Akola Crime News: अकोल्यात सरपंचाला बेदम मारहाण; मारहाणीचा CCTV व्हिडिओ समोर
मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे असे आहे. तर आरोपीचे नाव यश पाटोळे आणि प्रांजळ तावरे अशी आहे. लल्ला आणि आरोपींची ओळख हे जिम मध्येच झाली होती. यश आणि प्रांजळ या दोघांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. याचं शॉपमध्ये काल दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला होता. त्यावेळी, त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैश्यांची मागणी, या त्रासाला प्रांजळ कंटाळली होती. त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
जिम ट्रेनर प्रांजलसोबत काल दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला. त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशाने मिळून लोखंडही रॉड आणि पहारने मारहाण केली. यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेतील लल्लाला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.
हे दोघेही या सगळ्यानंतर स्वतः पोलिसांकडे स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले आणि घडलेला हा सगळा प्रकार पोलिसांना संगीला. प्रांजल आणि यश ज्या जिममद्ये ट्रेनर आहेत त्याच जिममध्ये हे दोघेही ट्रेनर आहेत. तिथेच याच याची ओळख झाली. मात्र, गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करुन का त्रास देत होता? असा आरोप केला जता आहे. मात्र, हे अद्यापही अस्पष्ट आहे. आता, पोलीस तपासात प्रांजल आणि यशकडून या बाबी समोर येतील. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
धाराशिव हादरला! जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.