सोलापूर येथून एक अजब कारनामा समोर आला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी असे काही केले की तो त्यात वाईट पद्धतीने अडकला आहे. नेमकं या पोराने केले तरी काय चला जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं?
साहिल महेबूब शहापुरे हा २२ वर्षाचा युवक आहे. तो सोलापूरच्या अशोकनगरमध्ये राहतो. तो सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण ही घेत आहे. त्याच्या वडिलांचे भंगाराचे दुकान आहे. ते चांगले चालावे म्हणून साहिलने आपल्याच परिसरातील दुचाकी चोरायला सुरुवात केली. त्याने जवळपास ११ दुचाकी चोरल्या. त्यानंतर या दुचाकीचे पार्ट तो वेगळे करायचा आणि आपल्या वडिलांच्या भंगाराच्या दुकानात ठेवायचा. यातले अनेक पार्ट त्याने रहीम इरफान शेख या भंगारवाल्याला विकले होते. शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीचा तपास सोलापूर पोलीस करत होते. त्याच वेळी त्यांना साहिल याची माहिती मिळाली.
Akola News: घराचं बांधकाम सुरु असतांना15 मजुरांना लागला विजेचा जोरदार शॉक; 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू
साहिल हा संशयतीरीत्या हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला एक दुचाकी चोरताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, सदर बाझारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वडीलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण हे कृत्य करत असल्याचं त्याने कबूल केलं आहे.
दुचाकी चोरल्यानंतर तो दुचाकीचे पार्ट वेगळे करण्यासाठी एका व्यक्तीला भेटत होते. त्यासाठी त्याला पाचशे रुपये देण्याचे ठरवले होते. परंतु त्यालाही या आरोपीने चारशे रुपयेच दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पार्ट खरेदी करणारे आणि पार्ट वेगळे करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने
छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आला आहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आले आहे. आईचे ११ तोळे दागिने आणि एक लाख ५५ हजाराची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगेश विलास आणि १९ वर्षीय तरुणी असे आहे. मंगेशचा मित्र कुणाल केरकरला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
Akola Crime News: अकोल्यात सरपंचाला बेदम मारहाण; मारहाणीचा CCTV व्हिडिओ समोर