Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही…”; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

'ज्या करांनी राष्ट्राला सावरायचे ते म्हणजे सावरकर,' या नावाच्या अर्थाला त्यांनी आजन्म न्याय दिला, असे शरद पोंक्षे चिंचवडमधील कार्यक्रमात म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 04:34 PM
"स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही..."; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

"स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही..."; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

Follow Us
Follow Us:

सावरकरांच्या विचारांची धग आजही कायम – पोंक्षे
‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन
संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक

पुणे: ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Pune News) यांना जाऊन सहा दशके उलटली, तरी त्यांच्या विचारांची धग आजही कायम आहे. मग विरोधक त्यांना आजही का घाबरतात?’ असा थेट आणि रोखठोक सवाल अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. ‘शब्द कधी फिरवला नाही, हिंदुत्व कधी सोडले नाही; म्हणूनच सावरकर आजही जिवंत आहेत,’ असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व जय मातृभूमी युवा मंच यांच्या सहकार्याने चिंचवड येथे ‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अनंत कोऱ्हाळे, कृष्णा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

India House : लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्राचे; स्वातंत्र्यरत्न वीर सावरकरांच्या कार्याला जागतिक पटलावर सम्मान

धर्मासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी, तर धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. ‘महापुरुषांच्या गोष्टी जिथे सांगितल्या जातात, तिथे सावरकर जन्माला येतात,’ असे पोंक्षे म्हणाले.
वयाच्या २३ ते ५४ या काळात सावरकर शिक्षा भोगत असल्याने समाजात सक्रिय राहू शकले नाहीत. त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशात विस्तारत होती. बंधमुक्त झाल्यानंतर त्यांनी हिंदू महासभा चे नेतृत्व स्वीकारून काँग्रेसच्या विचारसरणीला प्रखर विरोध केला. ब्रिटिशांनी असंतोष आटोक्यात ठेवण्यासाठी काँग्रेसची स्थापना केली, असा आरोपही त्यांनी केला.

वयाच्या ८३ व्या वर्षी आत्मार्पणाचा निर्णय घेतलेल्या सावरकरांनी राष्ट्राला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या साहित्यात आधीच दिली होती. ‘ज्या करांनी राष्ट्राला सावरायचे ते म्हणजे सावरकर,’ या नावाच्या अर्थाला त्यांनी आजन्म न्याय दिला. त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन आजही तितकेच प्रभावी असल्याचे पोंक्षे यांनी अधोरेखित केले.

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्राचे

महाराष्ट्र शासनाने परदेशातल्या एका ऐतिहासिक धरोहर लंडनमधील ताब्यात घेऊन ती स्मारक स्वरूपात जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. हे पाऊल स्वातंत्र्यलढ्याच्या परंपरेला जागतिक दर्ज्यावर स्थान देण्याचा मानस यामागे आहे. माहितीप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी संयुक्त बैठकीत India House खरेदी व संवर्धन याबाबत चर्चा केली आणि एका बहुविभागीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला. ही समिती कायदेशीर, आर्थिक व प्रशासकीय बाबींचा अभ्यास करून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल.

Web Title: Sharad ponkshe statement about swatantryaveer savarkar chinchwad event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • V. D. Savarkar

संबंधित बातम्या

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
1

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
2

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले
3

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…
4

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.