अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या मारहाणीचे मूळ कारण अद्याप समोर आले नाही आहे. मारहाण झालेल्या सरपंचाचे नाव प्रदीप फुके आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
नेमकं काय घडलं?
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते. वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. त्याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादादरम्यान सरपंच फुके यांना २ व्यक्तींनी मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. घटनेनंतर सरपंच फुके यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
घराचं बांधकाम सुरु असतांना15 मजुरांना लागला विजेचा जोरदार शॉक
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वसंता बरिंगे यांच्या घराच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. सेंट्रिंगचे काम करत असताना १४ ते १५ तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यातून १७ वर्षीय अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ओमप्रकाश केशवराव जांभळे असे आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी (ता. संग्रामपूर) येथील रहिवासी आहे. तो इतर मजुरांसोबत घराच्या स्लॅब टाकण्याच्या कामासाठी आला होता.
नेमकं काय घडलं?
वसंता बरिंगे यांच्या घराचे काम सुरु होते. स्लॅब टाकण्याचे काम आटपून मिक्सर मशीन बाजूला घेत असताना मिक्सरच्या गाडीचा विद्युत ताराला स्पर्श झाला आणि अनर्थ घडला. जवळपास १४- १५ जणांना विजेचा जोरदार शॉक लागला. बाकीच्यांना मिक्सरपासून लांब करण्यात आलं. मात्र अल्पवयीन ओमप्रकाश जांभळे याच्याकडे लक्ष न दिल्याने त्याला विद्युत ताराच्या प्रवाहाचा जोरदार झटका बसला. त्याला उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत आठ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सर्व कामगार हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रिंगचा साचा उचलताना तो वीजवाहक तारेला लागल्याने विजेचा शॉक बसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे वडगाव रोठे येथे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.