Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: हरियाणा हादरला! रंग लावल्याचा राग; दारू पाजली, रुळाला बांधलं आणि ट्रेनखाली चिरडून हत्या

हरियाणातील पाणीपत येथे होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या वादातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी त्याला जिवंत रेल्वे रुळाला बांधले आणि ट्रेनखाली देत खून केला. तिघांना अटक.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • होळीच्या दिवशी रंग लावल्याच्या वादातून तरुणाची हत्या.
  • आरोपींनी नशेत असताना रुळाला बांधून ट्रेनखाली दिले.
  • पोलिसांनी तांत्रिक तपासातून तिघांना अटक केली.
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून एका २३ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आधी दारू पाजले त्यांनतर दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून ट्रेन गेली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे या खुनाचा छडा लावला आहे.

नेमकं काय घडलं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कालू (२३) असे आहे. तर संजू, राहुल आणि विशाल या तीन आरोपींना अटक केली आहे. संजू हा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड आहे. होळीच्या दिशी कालूने प्रेयसीला रंग लावला होता, ज्याचा राग संजूच्या मनात होता. याच रागातून त्याने कालूचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी संध्याकाळी संजूने कालूला घराबाहेर बोलावले आणि तिघेही दारू पिण्यासाठी गेले. आरोपींची स्वतः कमी प्यायली आणि कालूला जास्त पाजली. तो पूर्णपणे नशेत झाल्यांनतर आरोपींनी त्याला रेल्वे रुळाजवळ नेले. तेथे संजूने कालूच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. तरीही तो मेला नाही, तेव्हा आरोपींनी त्याला जिवंत अवस्थेत रेल्वे रुळाला बांधले. नशेत असल्याने कालू स्वतःचा बचाव करू शकला नाही. काही वेळातच अंगावरून ट्रेन गेल्याने त्याचे तुकडे झाले.

Pune Crime : पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

कसा लावला शोध

सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असावी असा संशय होता. मात्र, कालूच्या मोबाईल लोकेशनचा डेटा आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला. कडक चौकशी केल्यानंतर तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. सुरुवातीच्या तपासात ही एक दुर्घटना असल्याचे मानले जात होते, मात्र त्यानंतर जीआरपी (GRP) ने केलेल्या तपासात हा खून असल्याचे उघड झाले.

दोघांमध्ये होते जुने वाद

जीआरपीचे पोलीस अधिकारी धर्मपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये जुने वाद देखील होते. कालूने एकदा संजूची दुचाकी घेतली होती, जिचा अपघात झाला होता. या अपघाताचे पैसे कालूने संजूला दिले नव्हते, त्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू होता.

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: हरियाणातील पाणीपत येथे ही घटना घडली.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: प्रेयसीला होळीचा रंग लावल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली.

  • Que: आरोपींनी काय केलं?

    Ans: त्यांनी तरुणाला नशेत रुळाला बांधून ट्रेनखाली दिलं.

Web Title: Haryana crime haryana shaken vengeance over being smeared with color victim plied with alcohol tied to railway tracks and crushed to death under a train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.