Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कमी उपस्थितीमुळे तृतीय वर्षाच्या फेरपरीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आलेल्या विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत सहानुभूती व्यक्त करतानाही न्यायालयाने विद्यापीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 10:20 AM
‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

‘सहानुभूती आहे, पण दिलासा नाही’; फेरपरीक्षेला मनाई, विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Follow Us
Follow Us:
  • कमी उपस्थितीमुळे विद्यार्थिनीला तृतीय वर्षाच्या फेरपरीक्षेला बसण्यास विद्यापीठाने मनाई केली होती.
  • मानसिक आजारामुळे अनुपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला, मात्र न्यायालयाने नियमांना प्राधान्य दिले.
  • शैक्षणिक संस्थांचे उपस्थिती व परीक्षा नियम ठरवण्याचे अधिकार अबाधित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकाकर्ती पर्सनॅलिटी डिसऑर्डरसारख्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र, न्यायालय विद्यार्थिनीला या प्रकरणी सहानुभूती देऊ शकते, कोणताही दिलासा देऊ शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीवेळी स्पष्ट केले. मुंबईतील विद्यापीठाच्या मानसशास्त्राच्या विद्यार्थिनीला तृतीय वर्षाची फेरपरीक्षा देण्यापासून मनाई केलेला निर्णय कायम ठेवला. याप्रकरणी विद्यापीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोणतेही ठोस कारण नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तीव्र नैराश्य आणि व्यक्तिमत्त्व विकारासारख्या समस्यांनी ग्रस्त मानसशास्त्राच्या तृतीय वर्षाच्या याचिकाकर्तीला कमी उपस्थितीमुळे मुंबईतील एका विद्यापीठाने १५ एप्रिलला परीक्षा देण्यापासून मनाई केली. ते रद्द करण्यासाठी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Pune News: जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी, पण लोहगडावर काळाचा घाला; 26 वर्षीय तरुण उद्योजकाचा 350 फूट दरीत पडून मृत्यू

आजारपपणामुळेच अनुपस्थिती

यावर्षीच्या शेवटच्या सत्रात याचिकाकर्तीला मानसिक आजाराचे निदान झाले. त्यामुळे, तिला नैराश्य, भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण आणि तणाव सहन न होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. तसे असले तरीही मागील सत्रांमध्ये तिची उपस्थिती आवश्यक टक्केवारीपेक्षा जास्त होती. आजारपामुळे आत्महत्येचे विचार आणि भास होण्यासारख्या लक्षणांचा समावेश होता.

तिचे पालक तिला मूळ गावी घेऊन गेल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी विद्यापीठाला दिली होती, परंतु, उपस्थित न राहण्याबाबत विद्यापीठाशी कोणताही पुढील पत्रव्यवहार केला नाही. याचिकाकर्ती सलग एक महिना अनुपस्थित राहिल्यानंतर, विद्यापीठाने १५ एप्रिलला अंतिम सत्राच्या पुनर्परीक्षेला बसण्यास मनाई करणारे पत्र पाठवले.

Pune Crime: पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या

सहानुभूती हा अधिकाराचा पर्याय असू शकत नाही

विद्यार्थिनीच्या वैद्यकीय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या महिन्यात होणाऱ्या तृतीय वर्षाच्या फेरपरीक्षेस बसण्याची विनंतीही केली होती. अन्यथा तिचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाईल आणि त्यामुळे तिच्या शैक्षणिक कारकीर्दीचे व मानसिक आरोग्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा दावा याचिकाकर्तीने केला होता. परंतु, शैक्षणिक बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप मर्यादित असून शैक्षणिक मानके व उपस्थितीचे नियमन करण्यासाठी शैक्षणिक संस्थाच सर्वांत योग्य आहेत, असे न्या, रियाज छागला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने विद्यार्थिनीला दिलासा नाकारताना स्पष्ट केले. तसेच, ते या तरुणीच्या परिस्थितीबाबत मनापासून सहानुभूती आहे. परंतु, सहानुभूती हा कायदेशीर अधिकाराचा पर्याय असू शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: High court refuses relief to student barred from third year re exam due to low attendance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • crime news
  • education
  • High court

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.