crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सातारा: सातारा जिल्ह्यातून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरून ही हत्या करण्यात आली आहे. डोक्यात घण मारून हत्या केल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माण तालुक्यातील हिंगणी गावाच्या हद्दीतील आसाळओढा परिसरातील घुटुकडे वस्तीवर बुधवारी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं असेल?
हत्या झालेल्या महिलेचे नाव अनिता बंडू घुटुकडे (वय 31) तर आत्महत्या करणाऱ्या पतीचा नाव बंडू अंकुश घुटुकडे (४०) असे आहे. प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले की, बंडू यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी घणाने तिच्या डोक्यात वार करून हत्या केली. तर विष प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली. अनिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला. तर शेजराच्या पत्र्याच्या शेडमध्ये बंडू चा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (31) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिता आणि बंडू घुटुकडे यांना दोन मुले असून, मुलगी चौथीत आणि मुलगा सहावीत शिक्षण घेत आहे. पालकांचे छत्र हरवल्याने ही दोन्ही मुले आता अनाथ झाली आहे. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आईकडील की वडिलांकडील नातेवाईक घेणार आहे. याचा निर्णय पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर होणार आहे. या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने संपवलं आयुष्य
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना पैठण तालुक्यातील नांदर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव राधा संतोष शेळके असे आहे. ती सुंदरवाडी झाल्टा येथील रहिवासी होती. राधाचा काही वर्षांपूर्वी संतोष शेळके यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
चाकूने भोसकून एकाची हत्या; सात वर्षांनी कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा