
crime (फोटो सौजन्य: social media)
सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
काय घडलं नेमकं?
१५ जानेवारीला पहाटे रांजोणा शिवारातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर नवनाथचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला आरोपी कोण असेल, हत्या कोणी केली असेल याचा सुगावा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा केला तेव्हा आडोशाला लपवलेली रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडली.
धाकट्या भावावर संशय आणि…
पोलिसांना मृतांचा धाकटा भाऊ गजानन याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो पोलिसांसमोर सर्व सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
का केली हत्या?
मोठ्या भावाशी त्याचे शेतातील कामावरून आणि इतर घरगुती कारणावरून सतत वाद होत असत. १५ जानेवारीच्या मध्यरात्री संतापाच्या भरात गजाननने झोपेत असलेल्या नवनाथच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने शेतातील काम आणि घरगुती वादाने हत्या केल्याची कबुली दिली.
अवघ्या दोन तासात जेरबंद
पोलिसांनी गजाननच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून अवघ्या दोन तासात त्याला जेरबंद केलं आहे. पोलिसांच्या तीक्ष्ण नजर आणि कामगिरी बद्दल कौतुक होत आहे. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत असून तपास सुरु आहे.
PCMC Municipal Election : मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Ans: वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे.
Ans: शेतीतील काम व घरगुती वादातून संतापाच्या भरात.
Ans: अवघ्या दोन तासांत.