Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरुरच्या आंबळे येथे भीषण अपघात; कीर्तनावरून घरी परतणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाची धडक

चौघांना धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला धावून जाण्याऐवजी संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अमानुष प्रकारामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून, एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2026 | 12:25 PM
न्हावरे-शिरूर रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा अपघात.

न्हावरे-शिरूर रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा अपघात.

Follow Us
Follow Us:
  • न्हावरे-शिरूर रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा अपघात.
  • कीर्तनावरून पायी घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक
  • अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
शिरुर : आंबळे (ता.शिरूर) येथे कीर्तन ऐकून आनंदाने घरी परतणाऱ्या चौघांवर काळाने घाला घातला. न्हावरे-शिरूर रस्त्याने पायी जाणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर केसरी हॉटेलसमोर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.

विशेष म्हणजे, चौघांना धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला धावून जाण्याऐवजी संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अमानुष प्रकारामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून, एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११, सर्व रा.आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी या घटनेप्रकरणी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावात सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त दररोज रात्री महाप्रसाद आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो, गुरुवारी (ता.२९) रात्री ज्योती झेंडे सासू कौशल्या झेंडे, मुलगा सोहम आणि शेजारी राहणारी व त्यांच्या चुलत जावेची मुलगी आरुषी हे चौघेही किर्तन ऐकण्यासाठी गावात गेले होते. कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा चौघेही न्हावरे-शिरूर रस्त्याच्या कडेने पायी आपल्या घराकडे निघाले होते.

दरम्यान, आंबळे गावाजवळ असलेल्या केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला पायी चाललेल्या चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात सोहम आणि आरुषी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर ज्योती आणि कौशल्या झेंडे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शिरूर येथे हलविण्यात आले.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

कौशल्या झेंडे यांना शिरूर येथील श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी कौशल्या झेंडे यांना मृत घोषित केले. तर ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाहनचालकाने जखमींना केली नाही मदत

अपघाताची माहिती मिळताच आंबळे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनचालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. एकाच कुटुंबातील सदस्यांसह दोन चिमुकल्यांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि वाहन चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनचालकाचा शोध घेण्याच्या सूचना

उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, पुढील कारवाईच्या आणि अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाचा व वाहनचालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, न्हावरे पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके पुढील तपास करीत आहेत.

FAQ

प्रश्न : अपघात कुठे झाला?
उत्तर : शिरूर तालुक्यातील आंबळे येथे न्हावरे-शिरूर रस्त्यावर केसरी हॉटेलसमोर अपघात झाला.

प्रश्न : अपघात कसा झाला?
उत्तर : कीर्तन ऐकून पायी घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.

प्रश्न : अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?
उत्तर : अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा, अशा तिघांचा मृत्यू झाला.

Web Title: Horrific accident at amble in shirur 3 people died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Accident News

संबंधित बातम्या

Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम
1

Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम

कामावर जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
2

कामावर जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
3

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
4

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.