
अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगरकडून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने निंबोडीजवळ समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे ५० ते १०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेल्या. या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलविले.
टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातातील वाहने ताब्यात घेण्यात आली असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे निंबोडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील वेगावर नियंत्रण आणि वाहनांच्या तांत्रिक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू
या भीषण अपघातात सेवानिवृत्त सैनिक रोहिदास कडभने यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह बाप्पू पवार यांचाही जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे सुद्धा वाचा : पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी
फरार चालकाचा शोध सुरू
अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला. कॅम्प पोलिसांकडून पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. चालकाच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुण वकिल महिलेचा प्रवास महामार्गावरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय राणेनगर उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात अचानक थांबला आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी झालेल्या या अपघातात ३० वर्षीय महिला वकील शितल दीपक नरूले (रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी शीतल या आपल्या मोपेडवरून (एमएच १५ एफएल ९५९०) न्यायालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या हॉटेल स्नेहींतसमोरील उड्डाणपुलावरून जात असताना, भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. या जोरदार धडकेमुळे त्या रस्त्यावर आदळल्या. अपघातानंतर झालेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा धक्का बसला.
Ans: अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर निंबोडी गावाजवळ हॉटेल उत्सवसमोर स्कॉर्पिओ आणि तीन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला.
Ans: या अपघातात सेवानिवृत्त सैनिक रोहिदास कडभने आणि बाप्पू पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर शिर्के गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला असून, कॅम्प पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.