
कामावर जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू; खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
चाकण एमआयडीसी परिसरात अनेक रस्त्यांच्या कडेला अवजड वाहने, कंटेनर आणि ट्रक उभे केले जातात. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे दृश्यमानता कमी होते, तर वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागाही अपुरी पडते. विशेषतः सकाळी कामगारांची कामावर जाण्यासाठी लगबग सुरू असताना अशा वाहनांमुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण होऊ शकतो. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी रस्त्याकडेला उभे असलेले कंटेनर किंवा ट्रक वेळेत नजरेस न पडल्यास अपघाताची शक्यता अधिक वाढते.
औद्योगिक परिसरात हजारो कामगार दररोज दुचाकीवरून प्रवास करतात. मात्र, अवजड वाहनांसाठी नियोजित पार्किंगची पुरेशी व्यवस्था आहे का, रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगवर नियमित कारवाई होते का आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत का, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का?
रस्ते वाहतुकीसाठी आहेत की अवजड वाहनांचे अनधिकृत वाहनतळ बनवण्यासाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिस आणि संबंधित प्रशासनाने नियमित तपासणी करून नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रतिबंधित ठिकाणी पार्किंग रोखणे, आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था करणे आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
या अपघाताचा तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि संबंधित वाहनाच्या पार्किंगची कायदेशीर स्थिती तपासातून स्पष्ट होईल. मात्र, दोन कामगारांचा जीव गेल्यानंतर तरी अनधिकृत पार्किंगच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होणार का, हा प्रश्न कायम आहे.
Ans: खेड तालुक्यातील शिंदे गावात भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कडेला अवजड वाहने, कंटेनर आणि ट्रक उभे केले जातात. त्यामुळे दृश्यमानता कमी होते आणि वाहतुकीसाठी जागा अपुरी पडते. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यास अपघातांचा धोका आणखी वाढतो.
Ans: रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर नियमित कारवाई करणे, अवजड वाहनांसाठी नियोजित पार्किंगची व्यवस्था करणे, अपघातप्रवण ठिकाणी पुरेसा प्रकाश आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे.