सौजन्य फोटो - सोशल मिडीया
जयपूर : कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मुलांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानमधील कोटा येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशी धडक होऊन मोठा अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला.
कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास शंभूपुरा गावाजवळ झाला. जेव्हा भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रूझर वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकशी धडक झाली. मृतांमध्ये उषा बाई, सुशीला, कैलाश, सान्वी, सज्जन, अनिता, बाबूलाल, जान्हवी आणि माधवी यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णवाहिकेने न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या वाहनात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील १५ सदस्य प्रवास करत होते. ते सर्वजण खाटू श्यामजींना भेटून राजस्थानहून परत येत होते. प्राथमिक अहवालानुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. गाडी चालवताना त्याला डुलकी लागल्याचे वृत्त आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना
पहाटे २ वाजण्याच्या सुमारास शंभूपुरा गावाजवळ कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या एका क्रूझर वाहनाची धडक बसली. वाहन भरधाव वेगात असल्याने धडक जोरदार होती. या दुर्घटनेत नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
पीडितांच्या देखभालीसाठी रुग्णालयात एक वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी (एडीएम-शहर) यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले.
FAQ
1. राजस्थानमध्ये भीषण अपघात कुठे झाला?
राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ हा अपघात झाला.
2. अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?
या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
3. अपघातात किती जण जखमी झाले?
या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






