Ramayana: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Ramayana: रणबीर कपूरच्या ‘रामायण‘ बद्दल सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. पण या चित्रपटात रणबीर, यश, साई पल्लवी यांच्या बरोबर एका छोट्या भूमिकेतल्या अभिनेत्याने सगळ्यांना चकित केलंय. तो म्हणजे सौरभ सचदेव असून याआधी त्याने ‘अॅनिमल’ मध्ये रणबीर सोबत काम केले. नितेश तिवारी यांनी बनवलेल्या या भव्य चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम झाला आणि साऊथचा स्टार यश रावण झाला.
चित्रपट येण्याआधीपासूनच सगळ्यांना सगळ्या कलाकारांचा लूक कसा असेल याची उत्सुकता होती. चित्रपट लागल्यावर हिरो-हिरोईन सोबतच साईडच्या कलाकारांनी पण लोकांना आवडलं. त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सौरभ सचदेवची. ‘अॅनिमल’ मध्ये व्हिलनचे नाव सौरभने कमावलेला होते. आता ‘रामायण’ मध्ये मारीच बनून आला.
ट्रेलरमध्येच सौरभची एक झलक दिसली होती. पडद्यावर तो फार वेळ राहत नाही. पण त्याच्याशिवाय गोष्ट पुढे सरकतच नाही. एवढं त्याचं काम महत्त्वाचं आहे. रावण सांगतो म्हणून मारीच सोन्याच्या हरणाचं रूप घेतो. ते चमकणारं हरीण बघून सीता मातेला ते हवं असतं. त्या म्हणतात मला ते हरीण आणून द्या. म्हणून राम त्या हरणाच्या मागे जंगलात जातात. मग मारीच रामाच्या आवाजात जोरात “लक्ष्मणा… लक्ष्मणा…” अशी हाक मारतो. सीतेचं रक्षण करायला लक्ष्मण पण कुटी सोडून धावत बाहेर येतो. आणि नेमकी हीच संधी साधून रावण सीतेला उचलून घेऊन जातो. म्हणजे सीताहरण घडतं ते फक्त मारीचमुळे. त्यामुळे रामायणातला सगळ्यात मोठा टर्न येतो तो मारीचमुळे.
2023 ला आलेल्या ‘अॅनिमल’ मध्ये सौरभने आबिद हक नावाचा व्हिलनचा रोल प्ले केला होता. त्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत होता. यामध्ये सौरभचं काम थोडं होतं पण त्याने लोकांचं लक्ष घेतलं होतं. त्याची बोलण्याची स्टाईल, डोळे, पर्सनॅलिटी सगळंच लोकांना आवडलं होतं. आता परत एकदा दोघे एकाच चित्रपटात आलेत. पण यावेळी त्यांचं नातं पूर्ण वेगळं आहे. आधी व्हिलन होता, आता पौराणिक काळातला मारीच झाला.
सौरभ बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही की तो फक्त अॅक्टर नाही. तो अॅक्टिंग शिकवतो पण. ‘द अॅक्टर्स ट्रुथ’ नावाची त्याची स्वतःची शाळा आहे. वरुण धवन, अर्जुन कपूर, दुल्कर सलमान, ऋचा चड्ढा सारख्या मोठ्या स्टार्सना त्याने अॅक्टिंग शिकवली. त्यामुळे त्याला अॅक्टिंगचा खूप मोठा अनुभव आहे.
गोष्टीप्रमाणे मारीच हा ताडकेचा पोरगा होता. आणि रावणाचा मामा होता. त्याला रूप बदलता यायचं. मायावी शक्ती होत्या त्याच्याकडे. रावणाच्या सांगण्यावरून त्याने सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं आणि सीताहरणाच्या प्लॅनमध्ये मदत केली. शेवटी रामाच्या बाणाने त्याचा शेवट झाला.या चित्रपटात रणबीर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंह असे मोठे कलाकार आहेत. आणि चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतो.
View this post on Instagram
Ans: अभिनेता सौरभ सचदेव याने मारीचची भूमिका साकारली आहे.
Ans: ‘अॅनिमल’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे सौरभ सचदेव चर्चेत आला.
Ans: मारीच सीतेला आकर्षित करण्यासाठी सोन्याच्या हरणाचे रूप धारण करतो.






