crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्यात गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. आता पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर तिच्याच सासऱ्याकडून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा समोर आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे आरोपी हा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहे.
1 हजाराची लाच घेणं भोवलं; तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
नेमकं काय घडलं?
लग्नाच्या पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तर पीडितेने असा आरोप केला आहे की तिचा पती म्हणजेच गौरव तांबे हा नपुंसक असून तिच्या सासऱ्याने ह्यामुळेच शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर सासूने आणि पतीने वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली होती. मुल हवं म्हणून सासऱ्या बरोबर शरिर संबंध ठेव असा दबाव सूनेवर पती आणि सासूकडून टाकला जात होता. 10 सप्टेंबर रोजी सासरे यांनी ओळखीचा धाक दाखवून रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या घरी घुसून जबरदस्ती शारीरिक सुखाची मागणी केली.
या धक्कादायक घटनेनं पुणे हादरून गेलं आहे. संबंधित प्रकरणात आरोपी पती गौरव जयसिंग तांबे (वय 35), सासू श्रद्धा जयसिंग तांबे (56 वय) आणि सासरे जयसिंग तांबे (वय 61) जे पोलीस खात्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी आहे. यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं
दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. माझ्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली. यात पुतण्याचा जीव गेला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पुतण्याला मारहाण केल्यानंतर हे दोघे बाप- लेक तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाप लेकाला अटक केली आहे.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहे. पोलीस पुढील तपास करीत असून पुढील कारवाई काय करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.