Photo Credit- Social Media
मुंढवा : हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून एका कुटुंबाला फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेत महिलेला देखील मारहाण 47 करण्यात आली आहे. पोलिसांनी बाप-लेक शुभम गायकवाड व राजेंद्र गायकवाड यांना अटक केली आहे. याप्रकरणी वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
गुरूवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला. तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीय मुंढवा-कोरेगाव पार्क रोडवर दुचाकीवर प्रवास करत असताना, एक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे पती राजेश यांनी हॉर्न वाजवला. यावर गायकवाड बाप-लेकाने वाद घालण्यास सुरुवात केली. शुभम गायकवाडने गाडीतून उतरून तक्रारदारांना शिवीगाळ करत थेट फायटरने हल्ला केला. हल्ल्यात राजेश वाघचौरे, त्यांची पत्नी सुवर्णा व मुलगी संस्कृती जखमी झाले. मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.
कॅनडामध्ये पंतप्रधान पदासाठीची शर्यत महागडी! पक्षाने ठेवली प्रवेश फी साठी ‘इतकी’ किंमत
पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आणि सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव यश ज्ञानेश्वर खलसे (वय 19 , रा. कात्रज) असून त्याच्यावर वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाख रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक अशोक येवले, संतोष जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पोलिसांकडून सराईत वाहन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पार्क केलेली वाहने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाला त्यांच्या बातमीदारांमार्फत यश खलसे याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. त्याच्याशी चौकशी केली असता, त्याने वाहन चोरीची कबूली दिली. त्याच्या आणखी तपासात तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले, ज्यात एफ झेड, होंडा शाईन आणि एक मोपेड जप्त करण्यात आली आहे. आरोपी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.
P Jayachandran: पंतप्रधान मोदींनी पी जयचंद्रन यांना वाहिली श्रद्धांजली
कर्वेनगर आणि कोलवडी गावात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची उघडकीस आली आहे. कर्वेनगर परिसरातील बंगला फोडून चोरट्यांनी 2 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला घेतले. याप्रकरणी तक्रार 26 वर्षीय महिलेने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
पोलिसांच्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील वेदांतनगरी परिसरात तक्रारदार यांच्या वडिलांचा बंगला आहे. त्या बंगल्याच्या दुमजली भागातून चोरट्यांनी पाठिमागच्या बाजूने प्रवेश केला आणि वडिलांच्या व काकाच्या बेडरूममधील कपाटातून दोन लाख 40 हजारांचा ऐवज चोरीला घेतला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.
अपघात की घातपात? आईला परत येतो म्हणून सांगून गेला अन्…
त्याच दरम्यान, नगर रस्त्यावरील कोलवडी गावात घरातून 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, 38 वर्षीय तक्रारदार शेतकरी आहेत. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत. दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे.