Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पुन्हा हादरलं! पतीने पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार; कारण वाचून व्हाल थक्क…; आरोपीला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता याचा पूनमशी २०१५ मध्ये विवाह झाला असून, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता, तसेच त्याला दारूचे व्यसन आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2025 | 05:21 PM
पुणे पुन्हा हादरलं! पतीने पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार; कारण वाचून व्हाल थक्क…; आरोपीला अटक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: तळजाई वसाहत परिसरात दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली.
पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक करण्यात आली. याबाबत पूनम यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता याचा पूनमशी २०१५ मध्ये विवाह झाला असून, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता, तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. पूनम घरकाम करतात. सोमवारी (३१ मार्च) रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार.  त्यानंतर चिडलेल्या दत्ताने घरातील कुऱ्हाडीने पूनमवर हल्ला केला. पूनमने आरडाओरडा केला. तेव्हा सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कुर्हाडीचा डोक्यात घाव बसल्याने पूनम या गंभीर जखमी झाल्या. दत्ताला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत.

भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

वारजे माळवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक) असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. याबाबत जय याचे वडील भगवान सुखदेव अवघड (वय ४८,रा. वाकळुनी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पुण्यात भीषण अपघात; भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, जय मूळचा जालना जिल्ह्यातील वाकळुनी गावचा रहिवासी आहे. रविवारी (३० मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार शुभम आणि त्याचा मित्र जय हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. वारजेतील स्वीट कॉर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वार शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सहप्रवासी जय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीस्वार शुभम जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान जयचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक नाईकवाडे करत आहेत.

 

Web Title: Husband attacks wife with axe for not paying for liquor pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी
1

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
2

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

Pune Book Festival: शांतता… पुणेकर वाचत आहेत’! 1 लाखांपेक्षा अधिक फोटोज..
3

Pune Book Festival: शांतता… पुणेकर वाचत आहेत’! 1 लाखांपेक्षा अधिक फोटोज..

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट
4

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.