Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

बीड शहरातील पेठ बीड परिसरातील सराईत गुन्हेगार सफवान खान मेहबूब खान आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 11:58 AM
सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार!
  • मोक्का कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
  • टोळीवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद 
बीड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता बीड शहरातील पेठ बीड परिसरातील सराईत गुन्हेगार सफवान खान मेहबूब खान आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे.

 

११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शेख मोहम्मद साद शेख हारूण हे मित्रासह सलीम पेट्रोल पंप, इमामपूर रोड येथून परतत होते. त्यावेळी सय्यद साद आझम याने रागाने पाहिल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर मारहाण करून त्याने मामा सफवान खान याला फोन करून बोलावून घेतले. सफवान खान याने जवळील पिस्तूलातून फिर्यादी आणि साक्षीदारांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी तपास केला. तपासात पठाण फरदिन पठाण फेरोज, शिकलकर अरबाज अब्दुल नवाब, सय्यद साद आझम आणि अमान खान नासेर खान पठाण यांच्यासह इतर सहा जणांचा सहभाग निष्पन्न झाला.

गंभीर गुन्ह्यांची नोंद 

टोळीतील आरोपींवर पेठ बीड, बीड ग्रामीण आणि बीड शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, अवैध अग्नीशस्त्रे बाळगणे, दंगा, अपहरण, घरात घुसून मारहाण आणि जबरी वसुलीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव केला सादर 

बीड ग्रामीण पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.

Web Title: The police have taken major action against the safwan khan gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Arrested News
  • Beed Crime
  • crime news

संबंधित बातम्या

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
1

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
2

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
3

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
4

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.