Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा तालुक्यातील येणेगुर परिसरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची वाहतूक व विक्री केली जात असल्याचा प्रकार मुरूम पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 12:53 PM
बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

उमरगा : उमरगा तालुक्यातील येणेगुर परिसरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची वाहतूक व विक्री केली जात असल्याचा प्रकार मुरूम पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. सोलापूर-येणेगुर मार्गावर सापळा रचून पोलिसांनी बुधवारी रात्री दारू वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत १९ बॉक्स व ८ बाटल्या दारूसह वाहन असा एकूण ४ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अमर प्रकाश येडगे (रा. येणेगुर) आणि काशीनाथ दिगंबर देवकर (रा. करवंजी) यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

अमर येडगे सूत्रधार?

या प्रकरणात अमर येडगे हा प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्ती कोण आहेत, तसेच येणेगुर परिसरात तयार होणारी बनावट देशी-विदेशी दारू इतर ठिकाणी किंवा जिल्ह्याबाहेर पाठवली जात होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांच्या सापळ्यात वाहन अडकले

मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येणेगुर येथे सोलापूर-येणेगुर मार्गावर सापळा रचला होता. यावेळी एमएच २५ झेड ३००० क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सुपतगाव शिवारात वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दारूसाठ्यासह वाहन जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. येणेगुरमध्ये तयार होणारी बनावट दारू केवळ स्थानिक पातळीवर विकली जात होती की विविध जिल्ह्यांत तिचा पुरवठा केला जात होता, याचा तपास सुरू आहे. या कथित रॅकेटची व्याप्ती किती आहे आणि त्यामागे आणखी कोण आहेत, हे आरोपींची चौकशी व पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई 

पोलीस अधीक्षक रीतू खोकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उमरगा विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात अमर महानुरे, चालक विलास सहाने, मिलिंद साखळे तसेच उमरगा पोलिस ठाण्याचे संतोष बोयणे, बिराजदार आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.

हे सुद्धा वाचा : साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

कच्चा माल ते विक्री; संपूर्ण साखळी रडारवर 

बनावट दारू तयार करण्यासाठी कच्चा माल कोठून आणला जात होता, दारू नेमकी कुठे तयार केली जात होती, कोणत्या ब्रँडच्या नावाने ती बाजारात पाठवली जात होती, बाटल्या, बुच व लेबल कोठून मिळत होते, तसेच हा माल कोणाला पुरविला जात होता, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या कथित प्रकरणात अन्य साथीदार, पुरवठादार, वाहतूकदार किंवा विक्री करणारे घटक सहभागी आहेत का, याचाही तपास केला जाणार आहे.

Web Title: The police have detained two individuals for selling liquor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
1

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
3

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
4

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.