Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू तपासादरम्यान पोलिसांना मृत रविशंकर हे जादूटोणा करत असल्याची गावात चर्चा असल्याची माहिती मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 02:16 PM
जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या

Follow Us
Follow Us:

गोंदिया : मुंडीपार एमआयडीसी येथे रात्रपाळीच्या कामावर जात असलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात उलगडा केला. जादूटोण्याच्या संशयातून हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जितेंद्र कोहळे (वय ४५) आणि कमलेश अशोक नेवारे (वय १९, दोघेही रा. टॉवरटोली, मुंडीपार) यांना ताब्यात घेण्यात आले. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

याबाबत विक्की रविशंकर रहांगडाले (वय ३१, रा. मुंडीपार) यांनी गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे वडील रविशंकर (वय ५८) हे रविवारी रात्रपाळीच्या कामासाठी दुचाकीने व्यंकटेश राईस मिल, एमआयडीसी मुंडीपार येथे जात होते. दरम्यान, चमडा फॅक्टरीजवळील रस्त्यावर रात्री ७.४५ ते ८.१५ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर भारदार हत्याराने चार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा : सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दरम्यान, जादूटोण्याच्या संशयातून कमलेश, जितेंद्र आणि दोन विधिसंघर्षग्रस्त चालकांनी रविशंकर यांचा खून करण्याचा कट रचला. रविवारी सायंकाळी आरोपींनी रविशंकरचा पाठलाग करून कुन्हाडीने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली.

गावातील चर्चेतून संशयितांपर्यंत धागा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू तपासादरम्यान पोलिसांना मृत रविशंकर हे जादूटोणा करत असल्याची गावात चर्चा असल्याची माहिती मिळाली. या कारणावरून काही जणांचा त्याच्यावर आरोप असल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली.

जादूटोणा खरंच कारणीभूत?

चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तीच्या मृत्यूला तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वारंवार बिघडणाऱ्या प्रकृतीला रविशंकरने केलेला जादूटोणा कारणीभूत असल्याचा त्याचा समज होता. त्याचप्रमाणे गावातील अन्य कुटुंबांतील मृत्यू आणि आजारपणासाठीही रविशंकरला जबाबदार धरले जात असल्याचे तपासात समोर आले.

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव ! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Web Title: Elderly man murdered on suspicion of practicing witchcraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • crime news
  • Gondia Crime
  • Murder Case
  • Nagpur Crime
  • Nagpur Murder Case

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
3

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
4

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.