crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली आहे. यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाचे नाव कैलास सरवदे असे नावे आहे.
कैलास सरवदे यांचे सात वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न होते. कैलास हा नेहमी दारू प्यायचा त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. याच वादातून मायाने कैलासाला मारहाण केली. यामध्ये तो बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोधित केले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीमुळं झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खळबळजनक! वडिलांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी चिमुकलीचा झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
दरम्यान, बीड जिल्ह्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. आता त्याच व्यक्तीच्या तीन वर्षाच्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे.दोन दिवसांपूर्वीच याच चिमुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. जयराम बोराडे असे चिमुकलीच्या मृत वडिलाचे नाव आहे. या घटनेने बीडमध्ये आता खळबळ उडाली आहे.
चिमुकली होती बेपत्ता
चिमुकली ही आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. त्यात आज सकाळी जिथे तिच्या वडिलांचा मृतदेह सापडला त्याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नाही आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, तर दोघांचा मृतदेह अशा अवस्थेत आढळून आल्याने हे कोडं सोडवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना