Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नेवासात चाललंय तरी काय? उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

नेवसे येथे शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपावरून उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 06:36 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • नेवासेत उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा दाखल
  • शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून दहशतीचे वातावरण निर्माण केले
  • या आरोपावरून गुन्हा दाखल
नेवासे येथे शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयाबाहेर काढून देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपावरून उपनगराध्यक्षांसह सहा नगरसेवक आणि अन्य तिघांविरोधात नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरात नगराध्यक्षांसह नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी घटना असून, त्यामुळे नेवासे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये उपनगराध्यक्षा शालिनी संजय सुखधान, त्यांचे पती संजय लक्ष्मण सुखधान, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र कारभारी काळे, दिनेश व्यवहारे, नगरसेविका सोनल राहुल चव्हाण, आसिफ पठाण, नगरसेविका जयश्री चंद्रकांत शिंदे, नगरसेवक जितेंद्र भाऊसाहेब कुन्हे, नगरसेवक स्वप्नील उर्फ सागर राजेंद्र मापारी आणि नगरसेवक संभाजी शिवाजी धोत्रे यांचा समावेश आहे.

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी शासकीय कामकाज सुरू असताना उपनगराध्यक्षांचे दालन अस्वच्छ असल्याच्या कारणावरून तसेच बैठकीस आमंत्रित अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून उपस्थित कर्मचाऱ्यांना धाकदपटशा व दमदाटी करून कार्यालयाबाहेर काढण्यात आले. तसेच २९ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे कार्यालयात काम करत असताना उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान व नगरसेवक जितेंद्र कुन्हे तेथे आले होते. यावेळी संजय सुखधान यांनी पत्नीला शिवी दिल्याचा बनाव करून अंगावर धावून आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Nanded News: विवाहाच्या काही तास अगोदर नवरदेवाने काढला पळ; किनवट तालुक्यात कुटुंबसंस्थेची चिंताजनक स्थिती

दरम्यान, उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांनी या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचा आरोप केला आहे. नेवासेकरांनी दिलेल्या विकासाच्या जबाबदारीपासून नगराध्यक्ष पळ काढत असून, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही या सर्व बाबींना संविधानिक पद्धतीने उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, स्वच्छतेबाबत बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांनी २७ जानेवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतरच आठवडाभराने फिर्याद दाखल झाल्याने या तक्रारीमागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Ahilyanagar news case registered against 6 corporators including deputy mayor in nevasa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.