Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: 10 महिन्यांच्या लग्नाचा भयानक शेवट! गर्भवती सोशल मीडिया स्टारची निर्घृण हत्या; पती फरार

हैदराबादजवळ गर्भवती YouTuber वैष्णवीची घरातच निर्घृण हत्या झाली. तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. पतीवर संशय असून तो फरार आहे. हुंड्याच्या छळामुळे वाद होत असल्याचा आरोप, पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 12:52 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • गर्भवती YouTuber वैष्णवीची घरात हत्या
  • पतीवर संशय, आरोपी फरार
  • हुंड्याच्या छळाचे आरोप, पोलिस तपास सुरू
हैदराबाद: हैदराबाद येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. Youtube वरील आपल्या फॅमिली व्लॉगसाठी ओळखली जाणारी २० वर्षीय चित्तारी वैष्णवी हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वैष्णवी तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मृत्यूला तिचा पती जबाबदार आहे. तिचा पती तिची निर्गुण हत्या करत फरार झालाय. पोलिसाचा शोध घेत आहेत. हैदराबाद जवळच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला मंडळातील माधापूर गावात ही घटना घडली.

रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

वैष्णवी तीन महिन्यांची गर्भवती होती आणि सोशल मीडियावर तिचे मोठे चहा ते होते, सुमारे 50 हजार लोक तिची व्हिडिओ पाहत होते. मंगळवारी 17 मार्च रोजी सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा वैष्णवी ही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली आढळली. तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर चाकूचे अनेक वार करण्यात आले होते.

TamilNadu Crime: प्रेमातून विवाह केला, धर्मही बदल मात्र शेवटी ॲसिड हल्ला! एका डोळ्याची 50% दृष्टी गेली, तर…

याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केलाय. व फॉरेन्सिक टीम ने घरातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले भारतीय दंड संहितेच्या कलम 80 हुंडाबळी आणि खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

१० महिन्यापूर्वीच लग्न

वैष्णवी आणि गदम हरीचे लग्न सुमारे दहा महिन्यापूर्वीच झाले होते. ते एकाच जातीचे होते, परंतु मुलाच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली नाही. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता. सुरुवातीला दोघे तिच्या पतीच्या घरी राहत होते पण वाद वाढल्यानंतर वैष्णवी माहेरी राहायला गेली होती.

घटनेच्या दिवशी झाले होते भांडण

वैष्णवीचा पती गदम हरी (वय 24 ) हा फरार आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की सोमवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले ज्या दरम्यान हरीने हा भीषण गुन्हा केला. वैष्णवी आणि हरी मध्ये काही काळापासून तणाव होता. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, हरी हुंड्यावरून त्यांच्या मुलीचा छळ करत होता. शेजारच्यांनीही दोघांमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणाची माहिती दिली ज्यात घटनेच्या रात्री झालेल्या जोरदार वादाचाही समावेश आहे.

आरोपीचा शोध सुरु

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. त्याने हत्या का केली? असावी अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस याचा देखील शोध घेत आहे.

Accident: लेह-लडाख ट्रिपवरून परतताना भीषण अपघात! कार 30 फूट दरीत कोसळली; पुण्याच्या तीन मित्रांचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हैदराबादजवळील जगतियाल जिल्ह्यातील माधापूर गावात घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: पीडितेचा पती गंदम हरी याच्यावर संशय असून तो फरार आहे.

  • Que: हत्येमागील कारण काय?

    Ans: हुंड्याचा छळ व कौटुंबिक वादामुळे हा प्रकार घडल्याचा संशय आहे

Web Title: Hyderabad crime the horrific end of a 10 month marriage pregnant social media star brutally murdered husband absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.