काय घडलं नेमक?
जिवलग तिघेही मित्र 26 फेब्रुवारी रोजी लेह- लडाख फिरण्यासाठी गेले होते. आपली ट्रिप संपवून ते पुण्याकडे परतताना अपघात घडला. चालकाला ढोलकी लागली असता चार चाकी वाहन नियंत्रण बाहेर गेली. त्यामुळे ती कार सुरुवातीला एका डिव्हायडरला आदळली त्यानंतर खोलदरीत कोसळली. हा अपघात कोठा जिल्ह्यातील कैथून पोलीस ठाणे हद्दीत घडला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास बालापुर आणि कराड या गावाजवळ घडलेल्या या घटने दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेनंतर जवळच्या लोकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना सुरक्षित स्थळी एका आरोग्य केंद्रात नेले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली होती. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरु
या अपघात मृत्यू झालेल्या तिघांची नावे अशी सिद्धेश अल्हाट (वय 21), कुणाल चोरडिया (वय 25) आणि मयुरेश पाडळे (वय 23) अशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासातून समोर आले की चालकाला ढोलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले होते. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र त्याची मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर हत्या करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या बारा वर्षे मुलाचे नाव साईराज गणेश मांजरे असे आहे.
Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ
Ans: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून दरीत कोसळली.
Ans: सिद्धेश अल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे अशी मृतांची नावे आहेत.
Ans: पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा तपास सुरू केला आहे.






