Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad News: हृदय पिळवटणारी घटना! 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं कळलंच नाही! ज्येष्ठ आई-वडिलांसोबत 4 दिवस मृतदेह घरातच

हैदराबादच्या ब्लाइंड्स कॉलनीत धक्कादायक घटना उघड! ज्येष्ठ दाम्पत्य 30 वर्षीय मुलाचा मृतदेह 4 दिवस घरातच ठेवून राहिले, मृत्यू झाल्याची कल्पनाच नाही. दुर्गंधीने शेजाऱ्यांना संशय आला आणि पोलिसांनी प्रकरण उघड केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 08, 2025 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 30 वर्षीय प्रमोदचा झोपेत मृत्यू; आई-वडील परिस्थिती समजून न घेता मृतदेहासह राहिले
  • दुर्गंधी पसरल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली
  • वृद्ध दाम्पत्य अशक्त, मदतीअभावी चार दिवस मृत मुलासोबत राहावे लागले
हैदराबाद: हैदराबाद येथील ब्लाइंड्स कॉलनीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ज्येष्ठ दाम्पत्याला आपल्या ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे कळलंच नाही, त्यांनी चार दिवस मुलाच्या मृतदेहासोबत काढल्याचे समोर आले आहे. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव प्रमोद आहे. तो आपल्या आई- वडिलांसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. प्रमोदचा मृत्यू झोपेत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत्यू झाल्यानंतरही घरातील ज्येष्ठ दाम्पत्य, कालीवा रामना आणि शांताकुमारी यांना मुलगा प्रतिसाद देत नाही असे समजत होते. तो झोपला आहे असे त्यांना वाटायचे. दोघंही वयोमानामुळे अशक्त झाल्याने आणि त्यांचा आवाज मंद असल्याने शेजाऱ्यांनाही काहीच कळाले नाही.

पुण्यात रक्तरंजित थरार! अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

शेजार्यांना दुर्गंधी आल्याने समोर आला प्रकार

चार दिवसांनंतर शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. एका शेजाऱ्यांने पोलिसांना तक्रार केली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. तेव्हा घरात पोलिसांना प्रमोदच्या मृतदेह आणि त्याचे आई-वडिल थोडसे बेशुद्ध असल्याप्रमाणे दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांना जाग केले त्यांना पाणी आणि जेवण दिले. त्यांची प्रकृती सावरल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाकडे सोपवले.

प्रमोदला मद्यपानाची सवय

कालीवा रामना हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांची पत्नी शांताकुमारी आणि त्यांचा लहान मुलगा प्रमोद यांच्यासोबत राहत होते. मोठा मुलगा दुसऱ्या शहरात राहतो. काही वर्षांपूर्वी प्रमोदच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते. ती आपल्या दोन मुलींना सोबत घेत आपल्या माहेरी राहत होती. स्थानिकांच्या माहितीनुसार प्रमोदला मद्यपानाची सवय होती.

परिसरात हळहळ

पोलिसांनी प्रमोदचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हैदराबादच्या ब्लाइंड्स कॉलनीत ही घटना समोर आली.

  • Que: मृत्यू कसा उघडकीस आला?

    Ans: घरातून येणाऱ्या दुर्गंधीवरून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले.

  • Que: दाम्पत्य मृतदेहासोबत का राहिले?

    Ans: वयोमान, अशक्तपणा आणि परिस्थितीचे भान न राहिल्याने त्यांना मृत्यूची कल्पना नव्हती

Web Title: Hyderabad news30 year old boys death was not known body kept in house with elderly parents for 4 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना
1

Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत
2

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल
3

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
4

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.