संग्रहित फोटो
दरम्यान याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर देखील वार केले. यात मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याचा उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चंदननगर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. खून झालेल्या अल्पवयीनाचे नाव लखन बाळू सकट (वय – १८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असून, टोळक्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सकट आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पार्कमध्ये थांबले होते. त्यावेळी हल्लेखोर आले, त्यांनी दोघांना शिवीगाळ केली व मारहाण केली. त्यानंतर सकटवर चाकूने वार करण्यात आले. घटनेची तातडीने माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या सकट आणि त्याच्या मित्राला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सकटचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्राथमिक तपासात वैमनस्यातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
उत्तमनगरमध्ये सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न
पुण्यातील उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर शस्त्रधारी टोळक्याने ऐन वर्दळीच्या वेळी सराफी दुकानात घुसून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुकान मालकाने शस्त्रधाऱ्यांना विरोध करत आरडाओरडा केल्याने तिघे पसार झाले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.






