Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाईल फोन सापडल्यानंतर डुल्ला यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. नंतर काही तासांतच साहिलच्या आत्महत्येची बातमी समोर आली. या सर्व घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 23, 2026 | 03:39 PM
IIT Bombay, Sahil Wakode, IIT Bombay Suicide Case,

IIT Bombay, Sahil Wakode, IIT Bombay Suicide Case,

Follow Us
Follow Us:
  • आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात मित्राचा मोठा खुलासा
  • मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी झालेली भेट अगदी सामान्य होती, मित्राची माहिती
  • साहिल उत्साही, मनमिळाऊ आणि बॅडमिंटन खेळाडू असल्याचा मित्राचा दावा
Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: आयआयटी मुंबईचा (IIT Bombay)  विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. साहिलने जातीय भेदभाव आणि संस्थात्मक दबावातून आत्महत्या केली, असा आरोप केला जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साहिलच्या एका जवळच्या मित्राने एक वेगळीच माहिती दिली आहे. साहिलच्या मृत्यूपूर्वी झालेल्या शेवटच्या भेटीत नेमक काय झालं. त्यांच्यात काय चर्चा झाली, यावर साहिलच्या मित्राने सांगितलं आहे. IIT Bombay Student Sahil Wakode Suicide Case Friend Reveals Last Meeting Details

साहिल खूप उत्साही आणि बॅडमिंटन खेळाडू.”

साहिलच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, साहिल आयआयटी मुंबईमधील त्याच्या सुरुवातीच्या मित्रांपैकी एक होता. पहिल्या वर्षात ते शेजारी-शेजारी असलेल्या खोल्यांमध्ये राहत होते आणि एकत्र बॅडमिंटनही खेळायचे. अभ्यासाव्यतिरिक्त साहिल कॅम्पस जीवनातही खूप सक्रिय होता आणि त्याला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडायचे. साहिलचा स्वभाव मनमिळाऊ होता. तो अनेकदा मित्रांना भेटायला जायचा आणि कॅम्पसमधील कॅफे व खाण्याच्या ठिकाणी वेळ घालवायचे. पहिल्या वर्षानंतरही ते दोघे संपर्कात होते.

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची

मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आमची भेट होती. भेट पूर्णपणे सामान्य होती. साहिल खाऊ घेऊन आला होता आणि दोघांनी काही वेळ एकत्र घालवला. त्यावेळी त्याच्या वागण्यावरून तो कोणत्याही मोठ्या त्रासातून जात असल्याचे दिसून आले नाही.

 त्याने कधीही जात किंवा छळाचा उल्लेख केला नाही.

साहिलच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्याला जातीय टिप्पणी आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागला. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपांची चौकशी करत आहेत.

मात्र, साहिलने मात्र कधीही त्याच्याकडे जातीय भेदभाव किंवा छळाबद्दल सांगितले नाही. आपल्याला स्वतःला साहिलच्या जातीबद्दल माहिती नव्हती आणि त्याने कॅम्पसमध्ये असे कोणतेही जातीय भेदभावाचा प्रकार पाहिला नव्हता, असा दावाही साहिलच्या मित्राने केला आहे. असे असले तरी, ही साहिलच्या मित्राची वैयक्तिक माहिती आणि अनुभव आहे. यामुळे कुटुंबीयांचे आरोप खरे किंवा खोटे ठरवले जाऊ शकत नाहीत. पोलीस सध्या या आरोपांची चौकशी करत आहेत.

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे

मित्राने प्राध्यापक दुला यांच्याबद्दल काय सांगितले?

साहिलच्या मित्राने प्रा. सत्यनाराणय डुल्ला यांच्याबाबतही बोलताना सांगितले की, प्राध्यापक डुल्ला हे विद्यार्थ्यांशी कठोर वागण्यासाठी ओळखले जात होते. मात्र, साहिलने त्यांच्याबद्दल कोणतीही जातिसंबंधित टिप्पणी किंवा छळाचा उल्लेख कधीही केला नाही. साहिलच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या परीक्षेच्या घटनेतील प्राध्यापक डुल्ला यांची भूमिका देखील तपासाचा एक भाग आहे.

अहवालानुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाईल फोन सापडल्यानंतर डुल्ला यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. नंतर काही तासांतच साहिलच्या आत्महत्येची बातमी समोर आली. या सर्व घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्यानंतर त्याच्यासोबत काय झाले हे आपल्याला माहीत नाही. आम्ही दोघेही वेगवेगळ्या विभागांमध्ये होतो, त्यामुळे त्या दिवशीच्या संपूर्ण घटनांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याचेही साहिलच्या मित्राने यावेळी स्पष्ट केले.

 

 

Web Title: Iit bombay student sahil wakode suicide case friend reveals last meeting details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • crime news
  • IIT Bombay
  • Student Suicide

संबंधित बातम्या

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!
1

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.