Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

परराज्यातून सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १.९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने ताब्यात घेण्यात आली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 07:01 PM
Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Follow Us:

मुंबई : पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी ८९ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सह-आयुक्त (अं. व द.) प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रदीप पवार यांनी संपूर्ण परिसरात परराज्यातील व बेकायदेशीर मद्य वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. पनवेल-मुंब्रा हायवेवरील दहिसर मोरी परिसरातून परराज्यातील अवैध मद्याची मोठी खेप नेली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने हालचाली करत दहीसर मोरी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर सापळा रचला. आणि काही वेळातच संशयित चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा सहाचाकी आयशर ट्रक (क्र. जीजे-२३-एवाय-१७१८) अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने ट्रकमध्ये वाहनांचे सुटे भाग भरलेले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्की माहिती असल्याने पथकाने ट्रकची ताडपत्री काढून कसून तपासणी केली.

Khan Sir News: खान सर जाणार तुरुंगात? गोळीबार प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल; पाटणा पोलीस कधीही करू शकतात अटक

तेव्हा अधिकाऱ्यांना खाकी रंगाचे शेकडो बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यात गोवा राज्यात निर्मिती झालेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचा साठा सापडला. विशेष म्हणजे या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर अथवा कमाल विक्री किंमत छापलेली नव्हती. महाराष्ट्र राज्यात या मद्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. पोलिसांनी ट्रकमधून एकूण १५३० बॉक्स जप्त केले, ज्यामध्ये ७३,४४० दारूच्या बाटल्या होत्या.

या प्रकरणी ट्रक चालक प्रविण किशनलाल कुमार याला अटक केली. या कारवाईत आयशर ट्रक, ७३ हजारहून अधिक दारूच्या बाटल्या आणि एक मोबाईल फोन असा एकूण १,८९,६६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रवीण कुमार विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या यशस्वी कामगिरीत निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आणि जवान कुणाल तडवी, अमित सानप, हनुमंत गाढवे व सागर चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार

आपल्या परिसरात कुठेही बनावट दारू, परराज्यातील बेकायदेशीर मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास, अथवा मिथेनॉल आणि क्लोरेल हायड्रेट सारख्या मानवी जीवाला घातक असणाऱ्या रसायनांची निर्मिती, भेसळ किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे; तसेच माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख संपूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…

Web Title: Illegal liquor transport crackdown liquor worth 1 9 crore seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • crime
  • illegal liquor
  • police

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.