Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hit and Run : कोथरूडमध्ये मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना उडवले; रहदारीच्या वेळीच घडला प्रकार

एमआयटी कॉलेजकडून पौड रोडने जात असताना ही घटना गुरुवारी आठच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2026 | 11:35 AM
Hit and Run : कोथरूडमध्ये मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना उडवले; रहदारीच्या वेळीच घडला प्रकार

Hit and Run : कोथरूडमध्ये मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना उडवले; रहदारीच्या वेळीच घडला प्रकार

Follow Us
Follow Us:
  • एमआयटी कॉलेज येथे मद्यधुंद अवस्थेत आढळला चालक
  • मद्यधुंद तरुणाला नागरिकांनी दिला चोप
  • कोथरूड पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील एमआयटी कॉलेज येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने तीन-तीन वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र, रहदरीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला. मद्यधुंद तरुणाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी वल्लभ बाळासाहेब बोडके (वय २४) या तरुणाला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात मेडिकलसाठी पाठवले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयटी कॉलेजकडून पौड रोडने जात असताना ही घटना गुरुवारी आठच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

वल्लभ बोडके सिंहगड रोड परिसरात राहत असून, तो मद्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी घेऊन एमआयटी कॉलेज परिसरात आलेला होता. पौड रोडकडे जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका दुचाकीसह तीन वाहनांना धडक दिली. चारचाकीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी कार अडवून तरुणाला पकडले आणि त्याला चोप देत कोथरूड पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्यासह कर्मचारी व अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. तरुणाला ताब्यात घेत घटनेची पाहणी केली.

FAQ (Frequently Asked Auestions)

आरोपीला पकडले का?

– हो. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कार अडवली, चालकाला बाहेर काढून चोप दिला, नंतर कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोथरूडमध्ये असे प्रकार वाढले का?

– हो, चिंताजनक आहे. कोथरूडच्या 25 वर्षीय मद्यधुंद चालकाने 4 वाहनांना उडवले, ट्रॅफिक पोलिसालाच कारमध्ये घेऊन पळण्याचा प्रयत्न.

हेही वाचा : गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Web Title: In kothrud an intoxicated car driver rammed into three vehicles nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.