
crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर: कौटुंबिक वादातून सासरच्या दोघांनी जावयावरच चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकास उर्फ बाल्या अरविंद डोंगरे (३२) आणि शशिकांत उर्फ श्रीकांत अरविंद डोंगरे (४५) दोन्ही रा. संजय गांधीनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जखमी जावई सुशिल हरीशचंद्र वासे (३६) रा. यादवनगर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुशील पेंटिंगची कामे करतो. दोन्ही आरोपी त्याचे मामसासरे आहेत. जवळपास २ वर्षापासून सुशील आणि त्याची पत्नी करिश्मा यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे करिश्मा सुशिलला सोडून माहेरी राहते. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सुशिल नाश्ता करण्यासाठी भीम चौकात गेला होता. तेथून संजय गांधीनगरातील बौद्धविहारात गेला. तेथे दोन्ही आरोपींशी त्याचा आमना-सामना झाला. सुशिलने दोघांनाही त्याच्या पत्नीची समजूत घालून घरी पाठविण्यास सांगितले. यावरून दोघेही चिडले आणि त्यांनी सुशिलला शिवीगाळ करीत धमकावले. वाद चिघळू नये म्हणून सुशील तेथून घरी परतला. दुपारी २ वाजताच्या सुमारास तो घरच्या हॉलमध्ये झोपला होता. या दरम्यान दोन्ही आरोपी त्याच्या घरात घुसले. सुशिलच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले, त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. ब्लॅकेटच्या साहाय्याने त्याने स्वतःला वाचवित घरातून पळ काढला. आसपासचे लोक गोळा झाल्याने आरोपी तेथून पसार झाले. तत्काळ त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी सुशीलच्या जबाबावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
नागपुरात ‘हिट अॅन्ड रन’, तरुण गंभीर जखमी; आरोपीचा शोध सुरु
ट्रेलर चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून पायी रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला जबर धडक दिली आणि पळून गेला. यात गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. मोनू जगनसिंग कश्यप (२८) रा. खापरी असे जखमीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनू हा मूळचा उत्तरप्रदेशातील शेफणी गावचा रहिवासी आहे. रोजगाराच्या शोधात तो नागपुरात आला. खापरी परिसरात त्याने भाड्याने खोली केली. परिसरातच राहणारे मोहम्मद अहमद बबन अहमद (४५) यांचा ब्लॅकेट विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एक वाहन आहे. त्या वाहनावर मोनूला ड्रायव्हरचे काम मिळाले. काही दिवसांपूर्वी तो गावी गेला होता. रविवारी तो नागपूरला परतला. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी तो ऑटोत बसला. सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास तो चिंचभवन चौकात ऑटोतून उतरला आणि पायी घराकडे निघाला. सर्व्हिस रोडवर आर. के. ट्रेडर्ससमोरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना ट्रेलर क्र. एमएच-४०/एके-०८०५ च्या चालकाने भरधाव वाहन चालवून मोनूला जबर धडक दिली.
Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक