Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गार ‘वडापाव’ दिल्याने विक्रेत्याला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

'वडापाव'वरून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडापाव अन् पुण्याचे नाते वेगळेच असून, बालेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2024 | 02:59 PM
गार 'वडापाव' दिल्याने विक्रेत्याला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

गार 'वडापाव' दिल्याने विक्रेत्याला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता ‘वडापाव’वरून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडापाव अन् पुण्याचे नाते वेगळेच असून, बालेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

वडापाव गार असल्याने तिघांनी विक्रेत्यावर काचेची भरणी फेकून मारत चहाचा थरमास फेकून देत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. यानूसार अंकुश कोंडीबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात अवैध धंदे सुरुचं; धनकवडीत जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्धवस्थ

पोलिसांच्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साईचौक येथे शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्याठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास ढेबे व त्याचे दोन मित्र सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थरमास खाली फेकून तो फोडला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकूम मारली. यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. गार वडापाववरून मारहाण झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.

मैत्रीणीचा जबडा केला फॅक्चर

मित्राने आपल्या मैत्रीणीला रस्त्यात अडवून मारहाण केली. यामध्ये त्या तरूणीचा जबडा फॅक्चर झाला आहे. मैत्रीण असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून ‘दुसऱ्यासोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे?’ अशी विचारणा केली आणि तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजी नगरमधील मॉडल कॉलनी परिसरात घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रोहन जगन्नाथ कदम (वय 27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदिराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वानवडीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र-मैत्रीण आहेत. दिवाळीपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दुपारी बाराच्या सुमारास तरुणी ही तिच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात असताना रोहनने पाहिले होते. त्यानंतर त्याने रागाच्या भरात तिचा रस्ता अडवून तिला मारहाण केली. त्याचबरोबर, त्याने तिच्या चेहर्‍यावर बुक्यांनी गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: In pune a vadapav seller was beaten up for serving cold vadapav nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप
1

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ
2

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
3

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
4

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.