Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच आढळले अर्भकांचे अवयव; परिसरात एकच खळबळ

राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2025 | 02:44 PM
माता न तू वैरिणी ! ट्रॅव्हल्समधून महिलेने अर्भकाला फेकले रस्त्यावर; वाटेत प्रसूती होताच केलं कृत्य

माता न तू वैरिणी ! ट्रॅव्हल्समधून महिलेने अर्भकाला फेकले रस्त्यावर; वाटेत प्रसूती होताच केलं कृत्य

Follow Us
Close
Follow Us:

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सहा ते सात अर्भकांचे अवयव आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आल्याची माहिती समोर आली. या कचऱ्यामध्ये सहा ते सात बरण्यांमध्ये भरून हे अर्भक उघड्यावर फेकल्याचे समोर आले आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अशाप्रकारे अर्भक आढळल्याची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, याबाबत महिला आयोगाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले, अशी प्राथमिक माहिती असल्याचे आयोगाने म्हटले आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे. १/२

— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) March 25, 2025

दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सात ते आठ अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले आहेत. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. प्रथमदर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर तातडीने दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाचे हे अवयव कोणी टाकले?  हा गर्भपाताचा प्रकार आहे का? याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई केली जाणार आहेत.

सीलबंद बरणीत भरले अवयव

मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद भरणीत भरलेले असून, त्यावर त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते 2020 मधील आहेत, अशी माहिती आता दिली जात आहे.

Web Title: Infants organs found in a garbage dump in daund nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • crime news
  • Daund Crime

संबंधित बातम्या

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
1

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
2

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
4

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.