Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

राज्य शासनाने शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी ड्राय डे घोषित केलेला असतानाही नवी मुंबईतील अनेक भागांत कथितपणे अवैध दारूविक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 02:16 PM
ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

Follow Us
Follow Us:
  • ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली
  • नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात
  • उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष?
सावन वैश्य | नवी मुंबई : राज्य शासनाने शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी ड्राय डे घोषित केलेला असतानाही नवी मुंबईतील अनेक भागांत कथितपणे अवैध दारूविक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. ड्राय डेच्या नियमांना धाब्यावर बसवून काही दारू विक्रेत्यांनी छुप्या पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवल्याने शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पनवेल तालुक्यातील मोठे खांदा गावात ड्राय डेच्या दिवशीही कथितपणे दारू उपलब्ध असल्याची चर्चा असून, ब्लॅकने दारू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. केवळ मोठे खांदा परिसरातच नव्हे, तर नवी मुंबईतील काही ठिकाणीही ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रेत्यांचा कथित धुमाकूळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

 

विशेष म्हणजे, नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातही दारू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याची माहिती आहे. ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रीवर निर्बंध असताना, अशा प्रकारे खुलेआम किंवा छुप्या पद्धतीने दारू उपलब्ध होत असेल, तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

दारू विक्रेते सक्रिय, अधिकारी मात्र गायब?

ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष देखरेख आणि गस्त घालणे अपेक्षित असते. मात्र, नवी मुंबईतील अनेक भागांत कथित अवैध दारूविक्री सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर दिसत नसल्याचा आरोप केला जात आहे. विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आणि कारवाई करणारी यंत्रणा गायब, अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हप्तेखोरीच्या आरोपांची चौकशी होणार का?

काही भागांत अवैध दारूविक्री सातत्याने सुरू राहत असल्याने स्थानिक यंत्रणेच्या कामकाजाबाबत तसेच कथित हप्तेखोरीच्या आरोपांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अवैध विक्रीला नेमके कोणाचे अभय आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोपेतून जागे व्हावे!

ड्राय डेच्या आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात होणे गरजेचे आहे. मोठे खांदा, नेरूळ रेल्वे स्थानक परिसरासह नवी मुंबईतील ज्या ठिकाणी ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री झाल्याचे आरोप आहेत, त्या ठिकाणांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रीचा धंदा तेजीत आणि सरकारी यंत्रणा मात्र शांत! शासनाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार की हा प्रकारही केवळ कागदोपत्री चौकशीपुरताच मर्यादित राहणार, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत ड्राय डेच्या दिवशी कुठे अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप आहे?

    Ans: पनवेल तालुक्यातील मोठे खांदा गाव आणि नेरूळ रेल्वे स्थानक परिसरासह नवी मुंबईतील काही भागांत ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप आहे.

  • Que: ड्राय डेच्या दिवशी दारूविक्री सुरू असल्याने कोणत्या विभागावर प्रश्न उपस्थित होत आहेत?

    Ans: अवैध दारूविक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • Que: अवैध दारूविक्री प्रकरणात नागरिकांनी काय मागणी केली आहे?

    Ans: मोठे खांदा आणि नेरूळ परिसरासह संबंधित ठिकाणी तातडीने तपासणी करून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि कथित हप्तेखोरीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: It is alleged that liquor was sold on the black market in navi mumbai on a dry day nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Dry Day
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Chipi Airport: कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीटाचे दर
1

Chipi Airport: कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीटाचे दर

Navi Mumbai News: जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती; पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या नियोजनापुढे नवे आव्हान
2

Navi Mumbai News: जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती; पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या नियोजनापुढे नवे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.