Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chipi Airport: कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीटाचे दर

Chipi Airport: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान आजपासून फ्लाय ९१ची नियमित विमानसेवा सुरू होत आहे. या प्रवासासाठी अवघा १ तास १० मिनिटांचा वेळ लागणार असून, विमानाचे वेळापत्रक, प्रवासी क्षमता आणि तिकीट दर जाणून घ्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 16, 2026 | 06:47 PM
कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

कोकणचा प्रवास आता अवघ्या १ तास १० मिनिटांत! नवी मुंबई-चिपी विमानसेवा आजपासून सुरू, जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Follow Us
Follow Us:
  • चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!
  • नवी मुंबई ते सिंधुदुर्ग रोज विमानसेवा
  • जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर
Chipi Airport: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आता प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान आजपासून नियमित विमानसेवा सुरू होत आहे. फ्लाय ९१ या विमान कंपनीकडून ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालवली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि तळकोकण यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. (Chipi Airport)

या विमानसेवेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबईहून दररोज सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी चिपी विमानतळावर पोहोचेल. तर चिपी विमानतळावरून सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी विमान नवी मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल. हे विमान सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईत दाखल होईल. या मार्गावरील प्रवासासाठी अंदाजे १ तास १० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सिंधुदुर्गला जाणाऱ्या विमानाची प्रवासी क्षमता ७२ इतकी आहे.

Indian Armed Forces: युद्धात कोण ठरणार वरचढ, माणूस की AI? पुण्यातील ‘मिलिट’मध्ये रंगले महत्त्वाचे चर्चासत्र

तिकीट दर

या विमानसेवेचे तिकीट दर अंदाजे ३,५०० ते ७,५०० रुपयांदरम्यान असणार आहेत. मात्र, प्रवासाची तारीख आणि तिकिटांची मागणी यानुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो. नवी मुंबई विमानतळावरून सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग आणि पुण्यासह एकूण १६ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाले होते. सुरुवातीला मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये ही सेवा बंद झाली. त्यानंतर चिपी विमानतळावरून पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी फ्लाय ९१कडून विमानसेवा सुरू करण्यात आली.

कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी कमी वेळ

आता नवी मुंबईशी थेट हवाई संपर्क सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः मुंबई आणि नवी मुंबई परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. पर्यटनासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांनाही या सेवेचा फायदा होऊ शकतो. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन सेवा आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, यापूर्वी विमानसेवा बंद पडल्याचा अनुभव लक्षात घेता, नवी मुंबई-चिपी मार्गावरील ही सेवा नियमित आणि अखंडित सुरू राहावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे?

    Ans: नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान आजपासून नियमित विमानसेवा सुरू होत आहे.

  • Que: नवी मुंबई ते चिपी विमानप्रवासासाठी किती वेळ लागणार आहे?

    Ans: या मार्गावरील विमानप्रवासासाठी अंदाजे १ तास १० मिनिटे लागणार आहेत.

  • Que: नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचे तिकीट दर किती आहेत?

    Ans: तिकिटांचे दर अंदाजे ३,५०० ते ७,५०० रुपयांदरम्यान आहेत. मात्र, मागणी आणि प्रवासाच्या तारखेनुसार दर बदलू शकतात.

Web Title: Navi mumbai to sindhudurg chipi airport daily flight service sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती; पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या नियोजनापुढे नवे आव्हान
1

Navi Mumbai News: जुन्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती; पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या नियोजनापुढे नवे आव्हान

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट,  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
4

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.