Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgao crime: जळगावात एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी; ६-७ तोळे सोने व ३५ हजार रुपये लंपास, खडसे यांची पोलिसांवर टीका

जळगाव शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना सामोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 28, 2025 | 11:16 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

जळगाव शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना सामोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यांनतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. सहा ते सात तोळे सोने व ३५ हजाराची रोकड लंपास केल्याचे माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Nagpur Crime News: नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यांने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले.
त्यांनतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपस सुरु केला आहे.

एकनाथ खडसे यांची पोलिसांवर टीका

एकनाथ खडसे म्हणाले की, रात्री घरफोडी झालेली आहे. बंगल्यातील सर्व रूमचे कुलूप तोडून चोरी केली आहे. काही सामानाची चोरी झाली आहे. माझ्या रूममध्ये ३५ हजार रुपये होते. पाच- पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेलेल्या आहे. खाली आमचे नातेवाईक राहत होते. त्यांचे पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येत आहे, पोलिसांच्या जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही.चोऱ्या, दरोडा असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ करतात. घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरही पडला होता दरोडा

याआधी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. ९ ऑक्टोबरला रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोक रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले होते. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती.

Uttar Pradesh Crime : १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…,अत्यंत क्रूरपणे करण्यात आली हत्या

Web Title: Jalgao crime theft at eknath khadses bungalow in jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • crime
  • eknath khadse
  • Raksha Khadse

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.