नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ
Nagpur Crime News: साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्याकडून झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर पीएसआय बदने याचे नाव लिहिले होते. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना ताजी असतानाच ता नागपुरातही पोलिसांवर अशाच प्रकारचा आरोप करण्यात आला असून, खाकीवर पुन्हा एकदा डाग लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. या तक्रारीमुळे नागपूरमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील पोलीस अधिकाऱ्याच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, आता उपराजधानी नागपूरातही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणानंतर नागपूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोप करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव उमेश शेळके असे आहे. उमेश शेळके यांने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी नागपूर पोलिसांकडून सुरू असून, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचा सखोल तपास करण्यात येत आहे. उमेश शेळके या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात २३ वर्षीय तरुणीने नागपूरमधील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत उमेश शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे उलटून गेले तरीही पोलिसांकडून आरोपीविरुद्ध ठोस कारवाई झालेली नाही. उलट, पोलिसांकडून “उमेश शेळके फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे,” एवढेच उत्तर मिळत असल्याचे तरुणीने सांगितले. या प्रकरणामुळे नागपूर पोलीस दलावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






