उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील झाँसी जिल्ह्यातून अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर गळा चिरला आणि भुसाखाली लपवून ठेवला. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे.
Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक
मिळलेल्या माहितीनुसार, साहिल रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी साहिलची शोधाशोध सुरु केली होती. सोमवारी, कुटुंबातील सदस्य शेतातील एका खोलीत शुद्ध घेत असताना, त्यांना भुसा ठेवलेल्या खोलीचा दरवाजा बाहे रून बंद दिसला. त्यांनी दरवाजा उघडल्यावर आतमध्ये साहिलचा मृतदेह भुसाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
त्याचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता आणि प्रायव्हेट पार्टही कापला होता. मृतदेह भुसाखाली लपवून ठेवण्यात आला होता. त्याची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
कुटुंबीयांचा आरोप काय?
साहिलच्या पालकांनी या निर्घृण हत्येसाठी मुलाचे काका अवतार आणि काकी मंजू यांच्यावर थेट आरोप केला आहे. कौटुंबिक वाद हे यामागील कारण असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तातडीने साहिलच्या काका आणि काकीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलीस तपास सुरु?
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस पथकासह फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी खोलीची कसून तपासणी केली असून पोलीस तपास करत आहेत. या हत्येमागील हेतू शोधात असून आरोपींचा कसून तपास सुरु आहे. कौटुंबिक वादातून एवढ्या क्रूरपणे हत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नोएडामधील आलिशान सोसायटीत संशयास्पद मृत्यू! ‘गे डेटिंग ॲप’वरील पार्टीदरम्यान ८व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री एक अत्यंत संशयास्पद मृतदेह सेक्टर -७४ येथील आलिशान सुपरटेक नॉर्थ आय सोसायटीत आढळून आला आहे. तो मृतदेह २९ वर्षीय तरुणाचा असल्याचे समोर आलं आहे. त्याच आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना अपघात आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहे.
Nagpur Crime News: नागपुरात साताऱ्याची पुनरावृत्ती; पोलिसाकडून २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक छळ






