crime (फोटो सौजन्य: social media)
जळगाव : शहरातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कदायक म्हणजे हा प्रकार सात दिवसांनी उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून सहकारी मुलींकडूनच मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: अर्धनग्न करत कामगाराला अमानुष मारहाण; जागीच मृत्यू; कारण अस्पष्ट
पुढे आलेल्या माहितीनुसार, शहरातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आल्याची धक्कदायक प्रकरण समोर आला आहे. वस्तीगृहात तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर सात दिवसांनी ही घटना उघडकीस आली. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीत वसतिगृहाच्या अधीक्षिका सोनिया दीक्षम यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी या घटनेची माहिती दिली. या प्रकरणात महिला आणि बालविकास आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
या आधीही वसतिगृहाच्या अधीक्षकांवर अनेक तक्रारी दाखल
आशादीप वसतिगृहातील एप्रिल महिन्यात एक बांगलादेशी तरुणी फरार झाली होती. तिचा अद्याप शोध लागलेला नाही आहे. असं असतांना देखील वसतिगृहातील एका तरुणीला बेकायदेशीररीत्या दोन दिवस बाहेर राहण्याची परवानगी देखील देण्यात आली होती. याबाबत अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी कुठलीही माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच वसतिगृहात दाखल बलात्कार पीडित तरुणीचे नाव उघड करण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
खळबळजनक! दारूच्या नशेत चालवली एसटी, ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात
एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दारूच्या नशेत एसटी बुसीमधील चालकाने आणि वाहनाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडली आहे. पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बस मध्ये हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष राहते आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पियुन असल्याचे प्रवाश्यांना निर्दर्शनात आले. यावेळी बसमधे ३७ प्रवाशी प्रवास करत होते. या साऱ्या प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच मोठा अनर्थ टळला आहे. संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आणि राज्य परिवहन विभाग नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Nagpur Crime : हल्दीराम समूहाला 9 कोटींचा गंडा; बनावट स्टॉक आणि कागदपत्रे दाखवून….