crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
तेलंगणा: तेलंगणातून एक धक्कदायक प्रकार समोर आले आहे. पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून बायकोची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाला आहे. मृतकाचे नाव स्वप्ना असे आहे, तर आरोपीचे पतीचे नाव नरेश असे आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहे. ही घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील अलेरू गावात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
नरेश आणि स्वप्ना यांना दोन मुले आहेत. यांचं किराणा दुकान आणि चिकन सेंटर आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट सापडला. त्यामुळे घरात भांडण आणि कलह सुरु झाले होते. मोठा मुलगा आई-वडिलांशी वाईट पद्धतीने वगात होता. यामुळे पती- पत्नीमधील मतभेद आणखी वाढले होते.
आरोपी नरेशला आपल्या पत्नीवर संशय होऊ लागला. त्यांचं वागणं मानसिक रुग्णासारखं झालं होतं.
मोठ्या मुलाच्या वागण्यावरून संताप
प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की पती- पत्नीमधील नेहमीच बांधणं होत होते. मोठा मुलगा अधिक हट्टी आणि उद्धट होत चालला होता. तो आई-वडिलांचं
मुळात काहीच ऐकत नव्हता. याच कारण म्हणजे त्याची आईसोबतची जवळीक होती, असं बोललं जात आहे. मोठ्या मुलाच्या वागण्यावरुन नरेश आणि स्वप्ना यांच्यात पुन्हा वाद झाला, आणि त्याच संतापाच्या भरात नरेशने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. घरात उपस्थित असलेल्या त्याच्या मुलांनी आणि इतर नातेवाईकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही आणि सपासप वार केला. या हल्ल्यामुळे पत्नी स्वप्नाचा जागीच मृत्यू झाला.
तपास सुरु
प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की मोठ्या मुलावरून वाद झाल्याने ही हत्या झाली. पोलिसांनी सांगितले की मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या मृतदेहगृहात पाठवण्यात आलं आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी नरेशच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
आईनेच केली दोन मुलांची निर्घृण हत्या
तेलंगाण्यातून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. एकाला तलावात बुडून मारलं तर एकावर धारदार शस्त्राने वार करून मारलं. एवढेच नाही तर मुलांच्या हत्येची डायरी देखील लिहिली होती.हत्येनंतर दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या हत्येची खोटी कहाणी रचली. मात्र, एका छोट्याशा सुगाव्यामुळे तीच कांड समोर आलं. तिला अटक करण्यात आली असून तिला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…