छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास एका २३ वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथील गट नंबर 37 ला घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अर्जुन रतन प्रधान असे आहे.
खळबळजनक! दारूच्या नशेत चालवली एसटी, ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात
कालच झाला होता पगार
पुढे आलेल्या माहितीनुसार, अर्जुन रतन प्रधान हा वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. कालच त्याचा पगार झाला होता. आणि आज सकाळी त्याचा अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. आज सकाळी त्याचा सावत्र भाऊ रामकृष्ण याला अर्जुन रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत गंभीर जखमी स्थितीत आढळून आला. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. अर्जुनच्या आईने मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. प्राथमिक तपासात अर्जुनला कपडे काढून अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले आहे. याच मारहाणीतून त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र ही मारहाण नेमकी कुणी आणि कुठल्या कारणातून करण्यात आली? हे अस्पष्ट आहे. याचा शोध पोलीस करत आहे.
समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…..
दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात एका कामगाराच्या पोटात थेट गोळी लागली. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथे घडली. समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरात घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारी झाली.
या हाणामारी दरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून असलेल्या पिस्तूलमधून अचानक गोळी भरत घाटगे यांच्या दिशेने सुटली, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. गोळीबारानंतर आरोपी कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाताय? तर सावध व्हा ! ‘इथं’ सूपमध्ये चक्क झुरळ सापडलं






