crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जळगाव: जळगाव शहरातून एक सांतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तसेच त्या तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिली आहे. भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला असतांना काही तरुणांनी विचारपूस केली. त्यानंतर या टोळक्याने संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची दुचाकी पेटवून दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दखल
या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावमध्ये कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर अंधाधुंद गोळीबार; जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता
जळगाव जिल्ह्यातील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कुसुंबा गावात जुन्यवादातून गोळीबार आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. हा गोळीबार अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास गणपती नगर परिसरात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
कुरियर कंपनीत काम करणारे चंद्रशेकर पाटील हे पत्नीसोबत घरी जेवतांना घटना घडली. घराबाहेर तीन दुचाक्या थांबल्या आणि त्यावरून पाच ते सहा अज्ञात तरुण उतरले. त्यांनी शिवीगाळ करत दगडफेक सुरु केली. ज्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घराबाहेर लावलेली दुचाकीही फोडण्यात आली. यानंतरच काही हल्लेखोरांनी घराच्या दिशेने तीन वेळा गोळीबार केला. अचानक झालेल्या फायरिंगने पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हादरला. या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याची माहिती नसली तरी घराचे आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून तीन गोळ्यांच्या पुंगळ्या जप्त केल्या. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, जुन्या वादातून ही कारवाई झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
धक्कादायक ! दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकून मारहाणही केली अन्…