पुणे: पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आधी तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिचा त्याच चाकूने गळा कापून हत्या केली. ही घटना पिंपरी चिंचवड येथील एका लॉजवर शनिवारी दुपारच्या सुमारास समोर आली आहे. ही हत्या प्रेमसंबंधातून संशयाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मेरी तेलगू असे २६ वर्षीय मृत प्रेयसीचे नाव आहे तर दिलावर सिंग असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.
किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरला प्रेयसी मेरी तेलगू हिचा वाढदिवस होता. मेरीचा वाढदिवस सेलेब्रेट करण्यासाठी दोघेही वाकड येथील एका लॉजवर गेले होते, त्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आरोपी दिलावर सिंग याने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने मेरीची हत्या केली आहे.
मेरीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी लॉजवर त्याने चाकू आणि ब्लेडने तिच्यावर वार करत तिची हत्या केली. ह्या हत्येनंतर आरोपी दिलावर सिंग याने थेट कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर आली. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सहा वर्षांपूर्वी पासूनची ओळख
मेरी आणि दिलावर यांची सहा वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर त्यांची मैत्री झाली. ज्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिलवारला मेरीवर संशय होता. मेरी दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडली असल्याचा संशय त्याला होता, याच संशयातून त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. मेरी ही डी-मार्टमध्ये काम करत होती, तर दिलावर हा हॉटेल व्यावसायिक आहे.
सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले
राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी नपडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक घटना समोर आली आहे. केक, तसेच बेकरी माल उत्पादक नामाकिंत कंपनीची वितरण एजन्सी सुरू करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ