Jalgaon News:
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे.2022 मध्ये दाखल गुन्ह्यात व्यवसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात व्यावसायिक तसेच फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळेच पोलिस अटक करत नसल्याचा आरोप वाणी यांनी केला होता. तसेच, “अजित पवार यांच्या दबावामुळेच पोलिस कारवाई टाळत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
वाणी यांच्या आरोपानंतर काही दिवसांतच विनोद देशमुखांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे त्यांच्या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता पुढे या प्रकरणाची चौकशी व कारवाई कोणत्या टप्प्यावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या प्रकरणात जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी व पणन विभागाचे कृती दल स्थापन करण्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी केली. तसेच, “शेतकऱ्यांनी कोणती पिके पेरावीत, जेणेकरून त्यांना विक्रीनंतर अधिक भाव मिळेल, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हवामान अंदाज, शेतमाल विक्री यासाठी माहिती दिली जाईल. यासाठी पीक काढणी मार्गदर्शक अधिकारी नियुक्त केले जातील.” असंही भरणे यांनी म्हटले आहे.