Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Accident: झाडावर आदळली कार, क्षणात पेटली आग; चालकाला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही

जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर भरधाव कारचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळली. धडकेनंतर कारने अचानक पेट घेतल्याने चालक नितिन प्रभाकर गवळी (35) यांचा कारमध्येच जळून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जाफराबाद-चिखली मार्गावर कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला.
  • अपघातानंतर कारला आग लागल्याने चालक नितिन गवळी यांचा जळून मृत्यू झाला.
  • वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिसांचा तपास सुरू.
जालना: जालना येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी भीषण अपघात झाल्याचे समोर आली आहे. एका वेगवान येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून कार एका झाडावर आढळली आणि थेट कारने भीषण पेट घेतला. हा अपघात एवढा भीषण होता की कार चालकाला कारमधून बाहेर पाडण्याचीही संधी मिळाली नाही. या भीषण अपघातात कार चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar Crime: शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसची एर्टिगा कारला जोरदार धडक, 2 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

काय घडलं नेमकं?

कार चालक नितीन प्रभाकर गवळी (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नितिन गवळी आपल्या कारने जाफराबाद-चिखली मार्गावर प्रवास करत होता. रविवारी पहाटे, त्याची गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोरात जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की, गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. दुर्घटनेनंतर काही क्षणांतच वाहनाला भीषण आग लागली. आगीचा भडका वाढल्याने कारने पेट घेतला आणि नितीन यांना बाहेर पडता न आल्याने या आगीत होरपळून चालकाचा मृत्यू झाला. तर काही मिनिटांतच कार जाळून पूर्णपणे खाक झाली.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक दोन तास बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघाताची घडल्याची बातमी समोर आली आहे. खालापूर फूड मॉलजवळ दोन अवजड वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मागून आलेल्या अर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिल्याने आणखी दोघेजण जखमी झाले. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन तास वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना रविवारी पहाटे घडली.

आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघाताने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुन्हा एकदा अपघातावरून चर्चेत आला आहे.

Solapur Crime: सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव काय होते?

    Ans: नितिन प्रभाकर गवळी (वय 35) असे मृत चालकाचे नाव होते.

  • Que: अपघात नेमका कसा झाला?

    Ans: भरधाव कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली आणि त्यानंतर कारने पेट घेतला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalna accident jhaavar adalali car instant petali fire didnt get a chance to get out of the car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
1

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
2

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
3

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
4

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.