
पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुजलकुमार महातो (वय १९, रा. सेक्टर १९, कोपरखैरणे) याच्यावर पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
पहाटेच्या वेळी मिनी सी-शोअर परिसरात वॉकिंगसाठी गेलेल्या एका नागरिकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. परिस्थितीची माहिती मिळताच या नागरिकाने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी रिक्षातून घटनास्थळी आले असावेत. हल्ल्यानंतर त्यांनी त्याच रिक्षातून घटनास्थळावरून पलायन केल्याचा संशय आहे. मात्र, आरोपी किती होते, हत्येमागील नेमके कारण काय आणि हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर तसेच सेंट्रल युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासह वाशी पोलिसांचे अधिकारी, क्राईम ब्रांचचे पथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून विविध महत्त्वाचे पुरावे संकलित केले असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
वाशीतील महत्त्वाच्या आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या मिनी सी-शोअर परिसरात पहाटेच्या वेळी तरुणाची हत्या झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहाटे वॉकिंग करणाऱ्या नागरिकाने वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आला. धारदार शस्त्रांचा वापर करून होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी गस्त आणि सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.
बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता