Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna News: जालन्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येतील आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली; फाशीची शिक्षा कायम

जालन्यात 2012 मध्ये 2 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी रवी अशोक घुमरेची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा कायम राहणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 15, 2025 | 10:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 2012 मध्ये जालन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या
  • सत्र न्यायालय, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने फाशी कायम ठेवली
  • राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळली, फाशी निश्चित
जालना: जालन्यामध्ये १३ वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीने दया याचिका दाखल केली होती. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही याचिका फेटाळली आहे. आरोपीचे नाव रवी अशोक घुमरे असे आहे. याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे.

प्रकरण काय?

2012 मध्ये जालन्यातील इंदिरानगर परिसरात एका २ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून रवीने मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. या घटनेने लोकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आरोपीना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निदर्शनेही झाली होती. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून १६ सप्टेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१६ मध्ये त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या अस म्हणत सर्वोच्च न्यायालयही संतापले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती.आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही नोव्हेंबर २०२५ ला त्याची दया याचिका फेटाळली आहे.

Pune Crime: तू तिच्याशी लग्न का केलं? प्रेयसीच्या नवऱ्याचा कोयत्याने निर्घृण खून; महिन्याभरापूर्वीच झालं होतं लग्न

चॉकलेटचं आमिष, अपहरण, बलात्कार अन् हत्या, १८ वर्षांनी उत्तरप्रदेशमधून आरोपी ताब्यात

वसई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २००७ साली एका चिमुकलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून १८ वर्षानंतर अटक केली आहे. आरोपीचं नाव नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा असे आहे.

काय घडलं होत?

वसई पूर्वच्या सातिवाली याभागात राहणाऱ्या बाबुला जगईप्रसाद गौतम हे राहत होते. याच परिसरात नराधम नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा देखील राहत होता. एके दिवशी बाबुला जगईप्रसाद गौतम यांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्दयी मारहाण करून तिचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेची फिर्याद ०१/०४/२००७ रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३६३, ३७६ गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या आणि अशा उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.

Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांची दहशत! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर थेट हल्ला, थेट कॉलर पकडली आणि…; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचे नाव काय?

    Ans: रवी अशोक घुमरे

  • Que: गुन्हा केव्हा घडला?

    Ans: 6 मार्च 2012 रोजी.

  • Que: सध्याचा निर्णय काय?

    Ans: दया याचिका फेटाळली; फाशीची शिक्षा कायम.

Web Title: Jalna news the president has rejected the mercy petition of the accused in the rape and murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Jalna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.